मातृशक्तीमुळे समाजाची निर्मिती
By Admin | Published: March 6, 2017 12:19 AM2017-03-06T00:19:33+5:302017-03-06T00:19:33+5:30
भारतीय तत्त्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी ...
सविता पुराम : भाजप महिला मोर्चा मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम
आमगाव : भारतीय तत्त्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली, दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. पूजा जरी पुरुष देवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तींची असे उदगार जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती सविता पुराम यांनी काढले.
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा आमगाव तालुका यांच्या वतीने महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक श्री लक्ष्मणराव मानकर अध्यापक विद्यालय सभागृहात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला तालुका अध्यक्ष मोहिनी निंबार्ते, उद्घाटक सविता पुराम, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे, महिला व बालकल्याण सभापती छाया दसरे, सविता इसरका, सुनंदा उके, अर्चना चिंचाळकर, अंजली जांभूळकर, सुषमा भुजाडे, ज्योती खोटेले, लीला कठाणे, योगीता पुंड, वंदना मटाले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमात पुढे सविता पुराम यांनी स्त्री ही त्याग, नम्रता, श्रध्दा व सुजाणपणा याची मूर्ती आहे. आज प्रत्येक पावलावर महिलांनी शिखर गाठला आहे. भारतीय संस्कृतीने समाजाला एकत्रीत करण्याची क्षमता दिली आहे. संस्कृतीचे जतन व आधुनिक विकासाचे धरोहर आपल्यावर आहे. मातृशक्तीमुळे सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते. भावी पिढी घडविण्यासाठी मातृशक्तीने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमात जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, छाया दशहरे, सविता इसरका यांनी मार्गदर्शन केले. आयोजित महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी नृत्य, हळदीकुंकू भेट वस्तू देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अर्चना चिंचाळकर यांनी तर आभार अंजली जांभूळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप महिला पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. मेळाव्याला आ. संजय पुराम, महिला सरपंच, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्या यांनी भेट दिली. जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी महिलांना प्रोत्साहन करणारे मार्गदर्शन केले. (वार्ताहर)