पर्यावरणपूरक शाडू मातीपासून मूर्तींची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:39 AM2021-09-05T04:39:52+5:302021-09-05T04:39:52+5:30

आनंद साधना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही शिक्षण, पर्यावरण, आरोग्य व युवा सक्षमीकरण या विषयांतर्गत कार्य करीत आहे. जनता विद्यालयात ...

Creation of sculptures from eco-friendly shadu clay | पर्यावरणपूरक शाडू मातीपासून मूर्तींची निर्मिती

पर्यावरणपूरक शाडू मातीपासून मूर्तींची निर्मिती

Next

आनंद साधना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही शिक्षण, पर्यावरण, आरोग्य व युवा सक्षमीकरण या विषयांतर्गत कार्य करीत आहे. जनता विद्यालयात पर्यावरण, निसर्ग संवर्धनाकरिता शाडू मातीपासून मूर्ती व इतर वस्तू तयार करणे या उपक्रमाअंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. यात पालकांच्या संमतीने एकूण ५४ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला. शाडू मातीपासून गणपती तयार करणे व इतर वस्तू कशा तयार करण्यात येतात, याबाबत माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

यावेळी पर्यावरण राज्य समन्वयक शिवा इंगळे, प्रशिक्षण तथा प्रकल्प अधिकारी समाधान रिंढे, यवतमाळ जिल्हा समन्वयक प्रदीप भड यांनी उपक्रम व वस्तू तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मुख्याध्यापक राजकुमार गभने, उपमुख्याध्यापक राजकुमार राठी, विज्ञान शिक्षक पंकज बोरकर, शिक्षक भारती बोंद्रे, संगीता खोब्रागडे, अजय बोरकर, प्रमोद संग्रामे, लीना मते, इंदिरा आरामे, राखी बिसेन, शिक्षकेतर कर्मचारी बंधू गोपाले दीपक पडोळे, अशोक लुटे, लक्ष्मी बिनझाडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Creation of sculptures from eco-friendly shadu clay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.