धानपिकाच्या दुबार पेरणीचे संकट टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:27 PM2018-06-27T22:27:54+5:302018-06-27T22:28:09+5:30
पावसासाठी चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांना वरूणराजाने बुधवारी मुक्तहस्ताने हजेरी लावली. सकाळच्या सुमारास पाऊस चांगलाच बरसला. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या सातही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. परिणामी दुबार पेरणीचे संकट ओढावत असताना बळीराजाचा चेहऱ्यावरील संकटाचे ढग काहीसे दूर झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसासाठी चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांना वरूणराजाने बुधवारी मुक्तहस्ताने हजेरी लावली. सकाळच्या सुमारास पाऊस चांगलाच बरसला. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या सातही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. परिणामी दुबार पेरणीचे संकट ओढावत असताना बळीराजाचा चेहऱ्यावरील संकटाचे ढग काहीसे दूर झाले आहे. तुमसर, साकोली व भंडारा येथे दुपारपर्यंत २० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मोहाडीत पाऊस बरसला
मृग नक्षत्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. ज्याठिकाणी पाऊस बरसला व जिथे सिंचनाची सोय उपलब्ध आहे, अशा शेतकºयांनी खरीप हंगामांत धानाची पेरणी केली होती. त्यानंतर काही शेतकºयांनी पेरणी केली. परंतु पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले. अशा स्थितीत दुबार पेरणी करावी लागणार का? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली होती.
दरम्यान, काल मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ बनले होते. बुधवार सकाळपासून पावसाच्या सरी बरसल्या. पावसाला सुरूवात होताच रेनकोट, छत्रीसह वाहनावर बसविणाऱ्या आच्छादनाची विक्रीही मोठ्या प्रमाणात होताना दिसली.
अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित
लाखांदूर :या पावसाने लाखांदूर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणने पावसाळ्यापूर्वी देखभाल व दुरुस्तीची कामे न केल्याने रात्री बराच वेळ अनेक भागातील वीज गायब होती. बुधवारीही अनेकवेळा वीज पुरवठयात व्यत्यय येत होता.या तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवस कडक उन व उकाडयाने हैराण झालेल्या व दुष्काळाने होरपळणाºया नागरिकांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. शहर व परिसरात मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला.
मागील कित्येक दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. पावसाळी धानाचे पºहे टाकल्यानंतर कृषीपंप नसलेल्या शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. काही शेतकºयांची पावसाअभावी पºहे वाळल्याने दुबार पेरणी केली होती. लाखांदूर तालुक्यातील सोनी, चप्राड येथे पावसासाठी शेतकºयांनी पुजापाठ सुरू केले होते. मात्र काल पावसाच्या चांगल्या सरी बरसल्या.