तिसऱ्या लाटेचे संकट, लहान मुलांचा ताप अंगावर काढू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:12+5:302021-08-02T04:13:12+5:30
बॉक्स सर्दी, खोकला, तापाची साथ सद्य:स्थितीत वातावरणातील बदलामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याची साथ सुरू आहे. त्यामुळे पालकांनी ...
बॉक्स
सर्दी, खोकला, तापाची साथ
सद्य:स्थितीत वातावरणातील बदलामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याची साथ सुरू आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी कुटुंबातील मोठ्या सदस्यांनी कोविड नियमांचे पालन करणेदेखील गरजेचे आहे.
बॉक्स
ताप आला म्हणजे कोरोना असे नाही, पण...
ताप येणे हे कोरोनाच्या संक्रमणातील प्रमुख लक्षण आहे. मात्र ताप आला म्हणजे कोरोना झालाच असे नाही. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता बालरोग तज्ज्ञ यांच्या सल्ल्याने लहान मुलांवर औषधोपचारासाठी सुरुवात करावी, जेणेकरून लहान मुलांना वेळेत उपचार मिळणे शक्य होईल.
कुठल्याही प्रकारचा ताप अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने लहान मुलांना वेळीच कोविड चाचणी करावी.
बॉक्स
बालकांसाठी कोविड केअर सेंटर
कोविडच्या संभाव्य तिसरा लाटेची पूर्वतयारी म्हणून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध सुविधा केली जात आहे. बाल रुग्णांसाठी खाटांसह ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय खासगी रुग्णालयांमध्येही खाटा राखीव ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागामार्फत तसे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
कोट
सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. मात्र कोरोनाचे संकट पूर्णतः टळले नाही. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता लहान मुलांची काळजी घ्यावी. सर्दी, खोकला आणि ताप असल्याने बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचारास सुरुवात करावी. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोविड चाचणी करावी.
यशवंत लांजेवार, बालरोग तज्ज्ञ, भंडारा