पाण्याने पीक वाहून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:25 PM2017-10-14T23:25:31+5:302017-10-14T23:25:56+5:30
मांढळ (दे) शिवारात बावनथडी प्रकल्पाअंतर्गत रेल्वे लघु उपकालवा क्रमांक ५ फुटल्याने सुमारे ५० एकरातील धान पीक वाहून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मांढळ (दे) शिवारात बावनथडी प्रकल्पाअंतर्गत रेल्वे लघु उपकालवा क्रमांक ५ फुटल्याने सुमारे ५० एकरातील धान पीक वाहून गेले. यासंदर्भात स्थानिक शेतकºयांनी प्रकल्प अधिकाºयांशी संपर्क केल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सिंचनाची हमी घेण्याची जबाबदारी घेणारे व पाठ थोपटवून घेणाºया अधिकाºयांवर कारवाईची मागणी शेतकºयांनी केली आहे. प्रकल्पाची कामे येथे निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. त्याचा हा पुरावाच म्हणावा लागेल.
शनिवारी दुपारी ३ ते ४ दरम्यान मांढळ दे येथे रेल्वे लघु उपकालवा क्रमांक ५ फूटला. सध्या बावनथडी प्रकल्पाचे पाणी धान पिकाकरिता देणे सुरू आहे. पाण्याचा दाब वाढल्याने कालवा फूटला. कालवा फूटल्याने परिसरातील सुमारे ५० एकरातील धान पीक नष्ट झाले. कालव्याचे पाणी बंद करण्याकरिता येथील शेतकरी राजू सेलोकर यांनी बावनथडी प्रकल्प अधिकाºयांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या धानपिक नुकसानीचे नुकसान भरपाई बावनथडी प्रकल्प अधिकाºयांनी द्यावी, अशी मागणी सेलोकर यांनी केली.
बावनथडी प्रकल्पाच्या लघु उपकालव्यांची कामे चार ते पाच वर्षापुर्वी परिसरात झाली आहेत. कामांचा दर्जा निकृष्ठ असून कालव्यातून पाणी समांतर वाहत नाही. कुठे उंच तर कुठे सखल असा हा कालवा आहे. वितरकेची कामे तर अतिशय निकृष्ठ आहेत. दोन ते तीन वर्षातच उपकालवा फूटतो यावरून येथील कामांचा दर्जा दिसून येतो. कालव्यात व वितरिकेत मोठे गवत वाढले आहे. त्याची स्वच्छता शेतकरीच करतो. दोन वर्षापुर्वी येथे कालवा फूटला होता. तेव्हा मुंबई-हावडा ट्रॅकजवळ नाल्यात अनेक दिवस पाणी साचले होते. धानपिकाला आता सिंचन कसे होईल, असा प्रश्न येथे पडला आहे. कालवा व उपकालव्याच्या कामांची चौकशी करण्याची मागणी राजू सेलोकर यांनी केली आहे.