१०,१६३ हेक्टरमधील पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:33 PM2017-11-12T23:33:53+5:302017-11-12T23:34:14+5:30
वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील १० हजार १६३ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील १० हजार १६३ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २२ टक्के रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.
धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाच्या लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे उत्पादन घटले. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकºयांची भिस्त रबी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, अकाली पाऊस, किडींचा प्रादूर्भाव आदी विविध कारणामुळे पीक संकटात आहेत.
यावर्षीच्या रबी हंगामासाठी ४५ हजार ६८७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले आहे. यासंदर्भात कृषी विभागाने यासाठी ४५ हजार ६८७ हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांसाठी निर्धारित केले असले तरी शेतकºयांनी आतापर्यंत केवळ २२ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. १० हजार १६३ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आलेली आहे.
यावर्षी आजपर्यंत गहू पिकाची १,२७८ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली.
हरभरा १,१७३ हेक्टर, लाख-लाखोळी ३ हजार ८७६, पोपट १३२, वटाना ६५, उडीद ७०६, मुंग ७८४, बरबटी ११, मका १३ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड पूर्ण करण्यात आली. जवस ८८३, मोहरी ६२, गळीत पिके १ हेक्टर, भाजीपाला ९९७ हेक्टर, बटाटा ५७, मिरची १२१ तर इतर रबी पिकांची ११७५ हेक्टर क्षेत्रात लागवड क्षेत्रात लागवड करण्यात आल्याची माहिती आहे.
अनेक पिकांची पेरणी रखडली
जिल्ह्यात परतीचा पाऊस पडला असला तरी रबी पिकांसाठी समाधानकारक नसल्यामुळे अनेक पिकांची पेरणी रखडली आहे. जिल्ह्यात केवळ २२ टक्के रबीची पेरणी झाली आहे. मसूर, वाल, चवळी, मोट व उडीद, सूर्यफुल, करडई, तीळ, ऐरंडी आदी पिकांची पेरणी झालेली नाही. खरीप हंगामात शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याची भर रबी हंगामात काढण्याचा शेतकºयांचा हेतू होता. मात्र ओलीताचे साधन नसल्यामुळे बहुतांश शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केलीच नाही. भंडारा तालुक्यात ७ हजार ६५१ सर्वसाधारण क्षेत्रापैकी कुठेच पेरणी केली नसल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मोहाडी तालुक्यात ३७२ हेक्टर, तुमसर ५ हजार ५१४, पवनी १ हजार २७५, साकोली ४७४, लाखनी ४८७ तर लाखांदुरात २ हजार ४१ हेक्टर क्षेत्रात पेरणी केल्याची नोंद आहे.