शौचालय बांधकामाचे कोट्यवधी रूपये अडले

By admin | Published: February 17, 2017 12:38 AM2017-02-17T00:38:39+5:302017-02-17T00:38:39+5:30

इंदिरा आवास योजने अंतर्गत बांधकाम करण्यात येणाऱ्या घरकुलासह शौचालय बांधकामाची अट घालून

Crores of rupees for the construction of the toilets were blocked | शौचालय बांधकामाचे कोट्यवधी रूपये अडले

शौचालय बांधकामाचे कोट्यवधी रूपये अडले

Next

लाभार्थ्यांची होतेय परवड : घरकूल योजना
राहुल भुतांगे   तुमसर
इंदिरा आवास योजने अंतर्गत बांधकाम करण्यात येणाऱ्या घरकुलासह शौचालय बांधकामाची अट घालून लाभार्थ्यास १२ हजार रूपयांचा निधी निर्मल भारत अभियाना अंतर्गत लाभार्थ्यांना देण्याचे शासन निर्णयात नमूद आहे. परंतु त्या निर्णयाला बगल देत वेगळेच फंडा बाहेर काढल्याने तालुक्यातील १,२७७ लाभार्थ्यांच्या शौचालयाचे १ कोटी ५३ लाख २४ हजार रूपये अडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सन २०१५-१६ मध्ये तुमसर पंचायत समिती अंतर्गत १५१७ घरकूल मंजुर करण्यात आले होते. पैकी २४ लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रा अभावी अपात्र ठरविण्यात आले. सदर घरकुल योजनेत लाभार्थ्यास १ लक्ष २८ हजार रूपये, निधी मिळणार होती यात बांधकामाकरिता १ लक्ष रूपये निर्मल भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधकामाकरिता १२ हजार रूपये, तर मनरेगा अंतर्गत अकुशल कामाकरिता १६ हजार रूपये असे एकूण १ लाख २८ हजार रूपयाची ही योजना आहे.
तालुक्यात पात्र १२७५ घरकुलापैकी ७०३ घरकुल हे पुर्ण झाले आहेत तर उर्वरित प्रगतीपथावर असून लवकरच पुर्णत्वास येत आहेत. शासन परिपत्रक २०१४ च्या नुसार लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी निधी हा जास्तीत जास्त तीन हप्त्यातच देण्यात यावा. घरकुलाचे लाभार्थ्यांकडून करारनामा करून घेतल्यावर पहिला हप्ता ३७ हजार रूपयाचे देण्यात यावे व त्यासोबत निर्मल भारत अभियानामधून शौचालयासाठी मिळणारे १२ हजार रूपयाचे अनुदान देण्यात यावे व तिसऱ्या हप्त्यापुर्वी शौचालयासह घरकुलाचे बांधकाम पूर्ण केल्यावर द्यावे असे निर्देश आहेत.
मात्र तुमसर तालुक्यात बांधकामाचे १ लक्ष व मनरेगाचे १६ हजार रूपये देण्यात आले मात्र निर्मल भारत अभियानाकडून शौचालयाचा एक रूपयाही देण्यात आला नसल्याने लाभार्थी आर्थिक संकटात सापडला असताना प्रोजेक्ट डायरेक्टर यांनी शासन निर्णयाला बगल देवून स्वच्छ भारत अभियानांतर्गत बेस लाईन सर्व्हे ज्यांची नावे असतील अशांनाच शौचालयाच्या निधीचा लाभ मिळणार असल्याचा नवा फंडा बाहेर काढून घरकुल लाभार्थ्यांचे दिड कोटी रूपयाचा निधी अडवून ठेवला आहे.

Web Title: Crores of rupees for the construction of the toilets were blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.