आंतरराज्यीय मार्गावरील पुलाचा पोचमार्ग धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:07 AM2017-11-04T00:07:42+5:302017-11-04T00:07:57+5:30
तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा-चचोली दरम्यान रस्त्यावरील पूलाचे बांधकाम अर्धवट आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा-चचोली दरम्यान रस्त्यावरील पूलाचे बांधकाम अर्धवट आहे. पूलाच्या अॅप्रोच रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नाही. रस्त्यावर गिट्टी, चुरी पडून आहे. येथे प्रवाशांचा जीव धोक्यात असून अपघाताला आमंत्रण देणारा हा रस्ता ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.
तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पूलाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु पूलाच्या दोन्ही बाजूला अॅप्रोच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. पूलाच्या पोचमार्गावर गिट्टी, बारीक चुरी पडून आहे.
यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना अपघाताची शक्यता असून दोन दिवसापुर्वी एका दुचाकीस्वारांचा येथे अपघात घडला होता. पोचमार्ग निसरडा येथे झाला आहे. गिट्टी व चुरी येथे किमान उचलण्याची गरज होती. संबंधित विभागाने दोन्ही पोचमार्गावर डांबरीकरण करून घेणे गरजेचे आहे. लाखोंचा हा पूल आहे, परंतू मुलभूत बाबींकडे येथे दुर्लक्ष केले जात आहे.
करारनाम्यात येथे डांबरीकरण करण्याची तरतूद नाही की, संबंधित विभागाचे लक्ष नाही. हा मुख्य प्रश्न आहे. या मार्गावरून अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दररोज ये-जा आहे. त्यांचे लक्ष याकडे गेले नाही, असे दिसून येत आहे. लहान तेवढ्याच महत्वपूर्ण सर्वसामान्यांना लक्षात येणाºया बाबीकडे संबंधित विभागांचे लक्ष जात नाही तर तांत्रिकदृष्ट्या सर्वसामान्यांना न कळणाºया बाबीकडे विभागाने लक्ष दिले असेल काय, हा संशोधनाचा विषय आहे. रस्ता हा सुरक्षित असला पाहिजे, असा नियम आहे. हा रस्ता तर धोकादायक ठरला आहे. दुर्लक्ष करणाºया विभागाला जाब कोण विचारणार हाच नेमका प्रश्न येथे उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.