चांदपूर हनुमान देवस्थानात भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:04 PM2018-01-01T23:04:35+5:302018-01-01T23:05:03+5:30
चांदपुर येथील जागृत हनुमान देवस्थानात नववर्षाचे पर्वाला आराध्य देवतांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
रंजित चिंचखेडे।
आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील जागृत हनुमान देवस्थानात नववर्षाचे पर्वाला आराध्य देवतांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळपासून हजारो भाविक मोठ्या संख्येने येथे पोहचले. मकरसंक्राती पर्वापर्यंत भाविकांची गर्दी वाढणारी असल्याने गैरसोय टाळण्यासाठी उपाय योजना करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अजय खंगार यांनी दिली.
चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थानात दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रेलचेल असते. परंतु विशेष पर्वावर ही वाढती गर्दी राहत आहे. नववर्षाचे पर्वावर राज्य आणि नजिकचे मध्यप्रदेशातुन हजारो भक्त भाविकांनी आराध्य दैवताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी हजेरी लावली आहे.
सकाळपासून या देवस्थानात भाविकांचे लोंढे दाखल झाले आहे. मकरसंक्रातीची पर्वापर्यंत भाविकांची वाढती गर्दी राहणार असल्याने देवस्थान ट्रस्टचे वतीने नियोजन बध्द कृती आरखड्याची अमलबजावणी करण्यात सुरुवात केली आहे. देवस्थानात पिण्याचे पाणी आदीची सोय करण्यात आली असून रात्री मुक्कामी राहणाºया भाविकांचे गैरसोय टाळण्यासाठी उपाय योजना करण्यात आलेल्या आहे.
लांब पल्ल्याचे ठिकाणाहून भाविक दाखल झाले आहेत. सातपुडा पर्वत रांगाचे घनदाट जंगलात देवस्थान असल्याने भाविकांना सुरक्षतता देण्यात आली आहे. नविन वर्षाचे पर्वाला पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी जागृत हनुमान देवस्थानात भाविकांनी दर्शन घेतले आहे. या देवस्थानात महिला व पुरुषाकरिता स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
वाढती गर्दीत गैरसोय होणार नाही. ट्रस्टचेवतीने नियंत्रण ठेवण्यात आले आहे. या देवस्थानात पार्किंगची प्रमुख समस्या आहे. जागेअभावी ही समस्या भेडसावत असल्याची माहिती आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी ट्रस्टने जुने दुकाने परिसरात मार्ग मोकळा केला आहे.
यामुळे वाहत धारकांची गैरसोय टाळण्यासाठी रामबाण उपाय ठरला आहे, वयोवृध्द व अपंगत्व भाविकांना दर्शनासाठीे ये-जा करणारा माग्र मोकडा करण्यात आला आहे. यामुळे भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसी हजारो भाविकांनी आराध्य देवांची पूजाआर्चा करून वर्षभर सुरूळीत रहावे, यासाठी आशिर्वाद घेतले. देवस्थान कमेटीने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या.
पर्यटनस्थळी पर्यटकांची हजेरी
ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ बंद असताना पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. चारचाकी वाहनाने भाविक दाखल झाले असून निसर्ग वैभव बघून आनंदीत झाले आहे. निसर्गाचा ठेवा या पर्यटन स्थळात असतांना विकासाची जोड देण्यात लोकप्रतिनिधी गेल्या पाच वर्षापासून अपयशी ठरल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जंगल परिसरात पर्यटकांचे पारिवारीक सदस्यांनी स्वयंपाक आदी केले. जलाशयात पाणी असल्याने पर्यटकांनी जलाशयपासून दुरावा ठेवला आहे. जलाशय शेजारी वन विभागाचे वतीने सुचनाचे फलक लावून जागृत केले आहे. या पर्यटन स्थळात मध्यप्रदेशातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. पर्यटन स्थळात विश्रामगृह व शहण्याचे सुविधा नसल्याने दिवस भर पर्यटन स्थळात हजेरी नंतर गावाची वाट धरली आहे. शकडो पर्यटकांची हजेरी असतांना शासनाला महसूल प्रापत झाले नाही.
मार्गावरुन वाहन धारकांची कसरत
चुल्हाड ते चांदपूर हा पाच किमी अंतरचा प्रमुख मार्ग देवस्थान आणि पर्यटन स्थळाला जोडणारा आहे. या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. या शिवाय मार्ग अरुंद असल्याने भाविकांना मोठी कसरत करावी लागली आहे. रस्ता दुरुस्ती करिता सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याची खंत देवस्थान ट्रस्टचे सचिव तुलाराम बागडे यांनी व्यक्त केली आहे.