नागपंचमीला परसोडी (नाग) येथे उसळली भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:41 AM2021-08-14T04:41:03+5:302021-08-14T04:41:03+5:30
दरवर्षी नागपंचमीला परसोडी/नाग येथे तालुक्यातील व परिसरातील हजारो भाविक पूजेसाठी येतात. त्यामुळे या गावातील अनेकांना, व्यावसायिकांना रोजगारही या माध्यमातून ...
दरवर्षी नागपंचमीला परसोडी/नाग येथे तालुक्यातील व परिसरातील हजारो भाविक पूजेसाठी येतात. त्यामुळे या गावातील अनेकांना, व्यावसायिकांना रोजगारही या माध्यमातून मिळतो. मात्र, प्रामुख्याने परसोडी येथील पुरातन नाग मंदिरात सर्पदंश झालेला व्यक्ती विषमुक्त होऊन बरा होतो, या श्रद्धेपोटी येथे भाविकांची गर्दी उसळते. यामुळे पुरातन काळापासून प्रसिद्धीस असलेले लाखांदूर तालुक्यातील परसोडी (नाग) म्हणून ओळखले जाते. पुरातन काळापासून या गावाला वरदान प्राप्त झाल्याने सर्पदंश झालेल्या व्यक्तीने या गावाच्या सीमेत प्रवेश केल्यास त्याच्या अंगातील विष नाहीसे होते व तो बरा होतो. तशी येथील गावकऱ्यांची श्रद्धाही आजपावेतो कायम आहे. अगदी पुरातन काळापासून सापाचे विष निष्प्रभ करण्याच्या वरदानाने प्रसिद्ध असलेल्या या गावाची एक पुराणकथा आहे. मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनावर या वरदानाची कसोटी लावणे शक्यच नसल्याने श्रद्धेपोटी नतमस्तक होणाऱ्या भाविकांच्या गर्दीत दरवर्षी वाढच होत आहे.
बॉक्स
येथे सापाचे विषही होते निष्प्रभ!
यावर्षी जुलै महिन्यापासून आजपर्यंत या नागमंदिरात जवळपास तीनशे रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती परसोडी (नाग) येथील नागमंदिर देवस्थानचे पुजारी यांनी दिली. परसोडी (नाग) येथील नागमंदिरात सर्पदंशाच्या अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून, सापाचे विष निष्प्रभ करण्याची या मंदिराबाबत अख्यायिका कायम आहे. नागपंचमीनिमित्त या मंदिरात भव्य यात्रेचे स्वरूप येते. परिसरातील हजारो भाविक आपापल्या गावातील दिंड्यांसह सहभागी होऊन नागदेवतेचे दर्शन घेतात.
130821\img-20210813-wa0043.jpg
परसोडी येथील नाग मंदिरात नागदेवतेची पुजा करतांना भाविक भक्त