कोका अभयारण्यातील लाखापाटील शिवतीर्थावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:00 AM2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:43+5:30

यानिमित्ताने हातझाडे परिवार कोका, नितीन भालेराव भंडारा व मुकूंद साखरकर यांचे वतीने तीन ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. डॉ. बाळकृष्ण सार्वे मित्रमंडळीच्या वतीने तसेच जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपते, पंचायत समिती सदस्या नितू सेलोकर, सुजाता फेंडर व परिसरातील विविध ग्रामस्थांच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

Crowd at Lakhapatil Shivaritha in Coca Sanctuary | कोका अभयारण्यातील लाखापाटील शिवतीर्थावर गर्दी

कोका अभयारण्यातील लाखापाटील शिवतीर्थावर गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देमहाशिवरात्री यात्रा : विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : भंडारा तालुक्यातील कोका वन्यजीव अभयारण्यातील कोका ते चंद्रपूर मार्गावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या लाखा पाटील शिवतिर्थावर हजारो भाविकांनी भगवान भोलेनाथचे दर्शन घेतले. वाघाच्या शेकड्यावर बसलेल्या लाखा पाटीलांना अभिवादन केले. लाखा पाटील येथे दोन दिवस यात्रा भरते. हर बोला हर हर महादेवाचा गजर करीत भाविकांनी पूजाअर्चना केली.
यानिमित्ताने हातझाडे परिवार कोका, नितीन भालेराव भंडारा व मुकूंद साखरकर यांचे वतीने तीन ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. डॉ. बाळकृष्ण सार्वे मित्रमंडळीच्या वतीने तसेच जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपते, पंचायत समिती सदस्या नितू सेलोकर, सुजाता फेंडर व परिसरातील विविध ग्रामस्थांच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
खमारी आरोग्य केंद्राचे वतीने व कोका उपकेंद्राचे सौजन्याने प्राथमिक उपचार शिबिर केंद्र लावण्यात आले. कोका वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी सचीव जाधव व कारधा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गजानन कंकाळे यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
यात्रेचे नियोजन व व्यवस्थापनासाठी लाखा पाटील देवस्थान समिती, कोका, इंजेवाडा, सर्पेवाडा, दुधारा, चंद्रपूर, रेंगेपार येथील ग्रामस्थ तसेच कोकाचे सरपंच संजय इळपाते व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि चेतन तितीरमारे, संदिप पंचबुध्दे, नुपूर चोले, राहूल लांडगे, राजा खांडेकर, निखिलेश ठवकर, तुषार पिंपळशेंडे, मुकूंद साखरकर, मित्र परिवार, डॉ. बाळकृष्ण सार्वे मित्र परिवार, हातझाडे परिवार यानी सहकार्य केले. आरोग्य शिबिरासाठी डॉ. चंद्रकांत वाहणे, डॉ. माधुरी साठोने, आरोग्य सेविका एस. एफ. चौधरी, डी. व्ही. धार्मिक, यशवंत भोयर यांनी सहकार्य केले.

Web Title: Crowd at Lakhapatil Shivaritha in Coca Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.