पवनीत बँकेत गर्दी; बाजारात शुकशुकाट

By admin | Published: November 13, 2016 12:24 AM2016-11-13T00:24:52+5:302016-11-13T00:24:52+5:30

केंद्र शासनाने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यामुळे व्यवहारात त्या नोटा घेण्यास व्यापाऱ्याचा नकार आहे.

Crowd in Pawneet Bank; Shukkukkat in the market | पवनीत बँकेत गर्दी; बाजारात शुकशुकाट

पवनीत बँकेत गर्दी; बाजारात शुकशुकाट

Next

चर्चा नोटा बंदच्या : नागरिक त्रस्त, नोटांच्या व्यवहारावर परिणाम
पवनी : केंद्र शासनाने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यामुळे व्यवहारात त्या नोटा घेण्यास व्यापाऱ्याचा नकार आहे. बँकेत पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना नोटा बदलून घेण्यास तसेच बँकेतून रक्कम काढण्यास अडचणी येत आहेत. पवनीचा आठवडी बाजार (शनिवार) असुन देखील बँकेत गर्दी तयार बाजारा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातून शेतकरी शेतमजूर व मजूर वर्गीय नागरिक मोठ्या संख्येने बाजार करण्यासाठी आले परंतू बाजारात जाण्यापूर्वी चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी तसेच चलनात असलेल्या नोटा बँकेतून काढण्यासाठी बँकेतील रांगेत अडकून राहीले. बाजारातील व्यवहार रोखीने करावा लागत असल्याने रक्कम नाही तर बाजार नाही अशी अवस्था नागरिकांची झालेली होती. तासन्तास रांगेत राहून लोक थकले पंरतू नोटा बदलण्यासाठी व विड्राल करण्यासाठी थांबलेले लोक बँकेच्या लिंक फेल प्रकारामुळे कंटाळले व आल्या पावली बाजार न करता परतले. देशात सामान्य नागरिकांची थट्टा सुरु असल्याचे त्रस्त झालेले नागरिक आपसात बोलत होते.
सहकारी पत संस्थेमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना देखील रक्कम उपलब्ध होवू शकली नाही. कारण त्यांच्याकडील दैनंदिन व्यवहाराची रक्कम सहकारी बँक किंवा राष्ट्रीय बँकेच्या शाखेत गुंतवलेली असते. त्यांना देखी मोठी रक्कम उपलब्ध होवू शकली नाही. नोटा चलनातून बाद झाल्यामुळे नगरातील मोठै तसेच लहान व्यापारी व किरकोळ विक्रेते यांना ५०० किंवा १००० ची नोट दाखवून व्यवहार न करता ग्राहक परतू लागला आहे. त्यामुळे त्यांचेही नुकसान झालेले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Crowd in Pawneet Bank; Shukkukkat in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.