कीटकनाशके खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:46 PM2018-09-05T22:46:22+5:302018-09-05T22:46:40+5:30

वातावरण बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात करपा, खोडकिड, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरु झालेली आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून गत दोन वर्षांपासून किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येत नसल्यामुळे शेतकºयांना महागडी औषधी घेण्यासाठी कृषी केंद्रात धाव घ्यावी लागत आहे.

The crowd for the purchase of pesticides | कीटकनाशके खरेदीसाठी गर्दी

कीटकनाशके खरेदीसाठी गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी केंद्र संचालकांची चंगळ : अनुदानावर पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वातावरण बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात करपा, खोडकिड, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरु झालेली आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून गत दोन वर्षांपासून किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येत नसल्यामुळे शेतकºयांना महागडी औषधी घेण्यासाठी कृषी केंद्रात धाव घ्यावी लागत आहे.
भंडारा जिल्ह्यात गत २१ व २२ आॅगस्ट रोजी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात रोवणी करून घेतली. सिंचनाच्या सुविधा असलेल्या शेतकºयांसाठी हा पाऊस वरदान ठरला. मात्र त्यानंतर धानपिकावर किडींचा प्रादूर्भाव झाला. परिणामी शेती पिवळी पडू लागली आहे. यावर आळा बसावा यासाठी शेतकºयांनी शक्कल लढवून अंधश्रद्धेचे प्रकार सुरु केले आहेत. सधन शेतकºयांनी कृषी केंद्रात जावून महागडी औषधी खरेदी केली. शेतपिकावर त्या औषधांची फवारणी देखील केली. मात्र फवारणीनंतरही कीड नियंत्रणात येत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. शेतकरी सध्या संकटात सापडला असून त्यांना कृषी विभागाच्या अधिकाºयांनी मार्गदर्शनाची ही योग्य वेळ आहे. एकीकडे कृषी विभागाचे अधिकारी जिल्ह्यात किडींचा प्रादूर्भाव नसल्याचे सांगत आहेत. कृषी विभागाचा हा प्रकार उंटावरून शेळ्या हाकण्याचा दिसून येते. शेतकºयांनी कर्ज काढून शेती कसत आहे. तर दुसरीकडे कृषी विभागाचे अधिकारी कीड नसल्याचे सांगून एक प्रकारे त्यांची थट्टा करून असल्याचे दिसून येते.
कीड नियंत्रणासाठी शेतशिवारामध्ये फवारणीचे चित्र सर्वदूर दिसत आहे. यासंबंधी सदर प्रतिनिधींनी कृषी केंद्र येथे भेट दिली असता किडनाशके घेण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात येत आहेत. औषधी घेऊन आमच्याकडून मार्गदर्शन देखील घेतात. अनेक कृषीकेंद्राच्या फलकावर किटकनाशकांची नावे, कंपनीचे नाव, पॅकींग, दर व साठा लिहिल्याचे दिसून आले. किटकनाशकांची नावे लक्षात घेता ही नावे शेतकºयांसाठी विचित्र असल्याचे सांगण्यात आले. किटकनाशकामध्ये फ्रोफेक्स, कॅनान, इनरेज, फन्टर, ग्लोफस, सेकंड, अष्टोबिया, पिलाँग आदी नावे दिसून आली.

Web Title: The crowd for the purchase of pesticides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.