तुमसर बाजारपेठेत उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:00 AM2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:50+5:30
तुमसर शहर तालुक्याचे मुख्यालय आहे. येथूनच संपूर्ण तालुक्याचा कारभार चालतो. तुमसर शहाराबाबत नगरपरिषद हेच सर्वशी आहे. अशा आविभार्वात प्रशासन निर्णय घेत आहेत. सायंकाळी उशिरापर्यत आदेश येथे काढल्या जात आहे. दरम्यान लॉकडाऊन शिथिलतेवरून जीवनावश्यक वस्तूच्या दुकानाव्यतिरिक्त इतरही दुकाने अटी व शर्तीच्या अधीन राहून दिवसाआड सम-विषम तारखेवर दुकान उघडण्याची अनुमती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात शासनाकडून शिथिलता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तुमसर शहरात दिवसाआड सम विषम तारखेनुसार दुकाने उघडण्याचे पत्रक जरी काढण्यात आले असले तरी त्याची माहिती शहरी व ग्रामीण जनतेला देण्यात आली नाही. परिणामी प्रत्येक नागरिक घराबाहेर निघून बाजारात फेरफटका मारुन आज नेमके काय सुरु आहे, याची सहनिशा करत घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे फिजिकल डिस्टनसिंगला फाटा फोडत बाजारात नागरिकांची गर्दी उसळत आहे.
तुमसर शहर तालुक्याचे मुख्यालय आहे. येथूनच संपूर्ण तालुक्याचा कारभार चालतो. तुमसर शहाराबाबत नगरपरिषद हेच सर्वशी आहे. अशा आविभार्वात प्रशासन निर्णय घेत आहेत. सायंकाळी उशिरापर्यत आदेश येथे काढल्या जात आहे. दरम्यान लॉकडाऊन शिथिलतेवरून जीवनावश्यक वस्तूच्या दुकानाव्यतिरिक्त इतरही दुकाने अटी व शर्तीच्या अधीन राहून दिवसाआड सम-विषम तारखेवर दुकान उघडण्याची अनुमती दिली. दुकाने कोणत्या दिवशी उघडे राहणार, याची फलके दुकानदारांनी दर्शनी भागावर लावले नाहीत. परिणामी तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठया संख्येने नागरिक साहित्य खरेदी करण्यासाठी तुमसर शहर गाठत आहे. तुमसरकर आज कोणती दुकान सुरु आहेत, ते पाहण्यासाठी बाजारात दुचाकी व चारचाकी वाहनांवर टिबलशीट बसवून फिरत आहे. पोलिसांना मेडिकल, भाजीपाला, किराणा, कपडा दुकान आदीचे नाव सांगून वेळ मारून नेत असल्याने पोलिसांचा धाक संपल्यागत झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने त्या निर्णयाची शहरात स्पीकरद्वारे (दवंडी) देऊन किंवा अन्य माध्यमातून जनजागृती केली असती तर कदाचित शहरी व ग्रामीण भागातील जनता नेमक्या त्याच दिवशी बाजारात गेले असते. मात्र सर्व आलबेल सुरु असल्यामुळे बाजारात मोठया प्रमाणावर गर्दी उसळत आहे. कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर गर्दी टाळा, असे शासन म्हणत असले तरी सतत होणारी गर्दी तुमसरकरांची डोकेदुखी बनली आहे.