जिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:32 AM2017-09-23T00:32:43+5:302017-09-23T00:33:39+5:30

जिल्ह्यातील शेकडो गरीब रूग्णांसाठी आधारवड असलेल्या जिल्हा रुग्णालयातच अस्वच्छतेने कळस गाठला आहे.

The culmination of uncleanness in the district hospital | जिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचा कळस

जिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचा कळस

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांची चिंता कुणाला : कारभार आरोग्य प्रशासनाचा, स्वच्छतेसाठी नागरिकांचा पुढाकार आवश्यक

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील शेकडो गरीब रूग्णांसाठी आधारवड असलेल्या जिल्हा रुग्णालयातच अस्वच्छतेने कळस गाठला आहे. परिणामी येथे उपचारार्थ येणाºया शेकडो नागरिकांच्या जीवाची पर्वा जिल्हा आरोग्य प्रशासन गांभीर्याने करीत आहे का? असा प्रश्न आपसूकच निर्माण होत आहे.
भंडारा जिल्ह्यातील महिला रुग्णांसाठी स्वतंत्र महिला रुग्णालय व्हावे हे दिवास्वप्न अजूनही पूर्ण व्हायला दशकांचा कालावधी लागेल का, असा सवाल कायम असताना अस्तित्वात असलेल्या जिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सद्यस्थितीत या रूग्णालयात कोट्यवधी रूपये खर्चून विविध विभागांतर्गत ईमारत बांधकाम तसेच अत्याधुनीकरणाचे काम सुरू आहे. जिल्हा रूग्णालय एका नव्या रूपात पहायला मिळेल त्यासाठी रूग्णालय कात टाकत असेल तर चिंता करायचे कारण नाही. परंतु रूग्णालयातील स्वच्छता हा विषय नेहमीच रुग्णांच्या आरोग्याकरिता महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर असतो. किंबहुना येथे उपचारार्थ येणारे नागरिकही किंवा रूग्णांचे नातेवाईकही जिल्हा रुग्णालयाची स्वच्छता ठेवण्यासाठी कुचराई करताना दिसत आहेत.
बाह्यरुग्ण विभागाला लागून असलेल्या चार माळ्यांच्य इमारतीत जाण्यासाठी लिफ्टची (केवळ रूग्णांसाठी) व्यवस्था आहे. याशिवाय पायºयांचा उपयोग करून वॉर्डांमध्ये जाता येते. परंतु या पायºयांवरच थुंकीचे डाग, सुपारी, कापसाचे बोंडे, रुग्णांनी केलेली उलटी पाहवयास मिळत असल्याचे चित्र आहे. भिंतीवर खर्रा किंवा पान खाऊन थुंकणाºया महानुभवांचीही या रूग्णालयात कमतरता नाही. विशेष म्हणजे बाह्यरुग्ण विभागाच्या प्रवेशद्वारावरच रूग्णांची चौकशी करून खर्रा, गुटखा किंवा अन्य तंबाखूजन्य पदार्थ बाहेरच काढून फेकण्यात येत असल्यामुळे त्यांच्यावर काहीसा वचक आहे.

विषाणूजन्य आजारांचा विळखा
रुग्णालय परिसरात कुठे गवत वाफलेले असून पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जलकुंभाजवळ असलेल्या नालीत नागरिक स्वत: वाचलेले अन्न व कचरा फेकतात. स्वच्छता किती दिवसांनी होते जिल्हा रूग्णालयाच्या व्यवस्थापनेलाच ठाऊक. इमारतींमधील व्हरांड्याची अवस्था चांगली नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूसह अन्य विषाणूजन्य आजारांचा हैदोस आहे. अशा स्थितीत रूग्णालय प्रशासनाने स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी. तरच स्वच्छ भारताची संकल्पना साकारता येईल. दुसरीकडे रूग्णालय स्वत:चे समजून स्वच्छतेची काळजी प्रत्यकाने घेतल्यास जिल्हा रूग्णालयालाही स्वच्छतेचे दिवस येऊ शकतात.

जिल्हा रुग्णालय ४०० खाटांचे असून येणाºया रुग्णांची संख्या त्यापेक्षा जास्त असते. परिणामी कर्मचाºयांचा तुटवडा व अन्य सोयी अपुºया पडत असल्याने त्रास निर्माण होतो. जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेबाबत नागरिक व रुग्णांनीही सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे.
- डॉ.रविशेखर धकाते, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा

Web Title: The culmination of uncleanness in the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.