कोंढा येथे संचारबंदी नावापुरती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:35 AM2021-04-17T04:35:43+5:302021-04-17T04:35:43+5:30
शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. त्यासाठी बाजारपेठ बंद केले. ३० एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या ...
शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. त्यासाठी बाजारपेठ बंद केले. ३० एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या संचारबंदीतही लोकांचा मुक्तसंचार सुरू आहे. पोलीस नावापुरते येथे येऊन पाहत असल्याने लोक इकडेतिकडे फिरताना दिसत आहे. भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोंढा मेन रोड येथे सर्वांत जास्त गर्दी रोज बँक ऑफ इंडिया शाखेसमोर असते. येथे सकाळी १० वाजल्यापासून लोक पैसे काढणेसाठी गर्दी करतात. त्यावेळी ते सामाजिक अंतर ठेवत नाही. तसेच ग्राहकासोबत येणारेही भरपूर लोक असल्याने येथे दररोज प्रचंड गर्दी असते. येथे येणारे लोक कोरोनाची कोणतीही भीती बाळगताना दिसत नाही. तेव्हा गर्दीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. शासनाच्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.