व्यसन समाजासाठी अभिशाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:25 PM2017-10-12T23:25:33+5:302017-10-12T23:25:49+5:30

कुठलेही व्यसन हे शरीरासाठी घातक आहे. व्यसनाने संपूर्ण कुंटुंब उद्ध्वस्त होताना आपण पाहात आलो आहोत. खºया अर्थाने समाजात अजूनही जनजागृती झाली नाही.

Curse for addictive society | व्यसन समाजासाठी अभिशाप

व्यसन समाजासाठी अभिशाप

Next
ठळक मुद्देनितीन दुरगकर : जैन कलार समाजातर्फे गुणवंतांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कुठलेही व्यसन हे शरीरासाठी घातक आहे. व्यसनाने संपूर्ण कुंटुंब उद्ध्वस्त होताना आपण पाहात आलो आहोत. खºया अर्थाने समाजात अजूनही जनजागृती झाली नाही. मुलीच्या लग्नाच्या वेळी व्यसनी मुलगा सुधारेल या आशेपोटी लग्न लावून दिले जाते. जोड़ीदार नीट निवडा अन्यथा जीवन भर पश्चाताप करावा लागतो. व्यसन समाजासाठी अभिशाप आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक नितीन दुरगकर यांनी केले.
भंडारा येथे जैन कलार समाजातर्फे अखिल सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कोजागिरी समारंभ पार पडला. यावेळी ते समाजातील मुला-मुलींना मार्गदर्शक म्हणून संबोधित करीत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नितीन दुरगकर अध्यक्षस्थानी डॉ प्रल्हाद हरड़े उपस्थित होते. यावेळी मंचावर चंदन रणदिवे, अरविंद शेंडे, घनश्याम भांडारकर, विजय खेड़ीकर, चंद्रप्रकाश दुरगकर, दत्तात्रय खंगार, प्रशांत खोब्रागडे, प्रल्हाद चिरवतकर, निर्मला घाटबांधे आदी उपस्थित होते. यावेळी जैन कलार समाजातील गुणवंतांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी जैन कलार समाजाचे अध्यक्ष विजय खेड़ीकर, दत्तात्रय खंगार, रविंद्र भांडारकर, अजय क्षीरसागर, संजय आदमने आदी सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: Curse for addictive society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.