ग्राहकांनी वीज देयक काळजीपूर्वक बघणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:10 PM2018-11-16T22:10:32+5:302018-11-16T22:10:48+5:30

महावितरण कंपनी जनतेच्या खिशाला 'फटाके' लावत आहे. वेगवेगळ्या आकाराच्या माध्यमातून बेमालूमपणे वीज दरवाढ करण्यात आली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात ५५ रुपयांवर असलेला स्थिर आकार आता तब्बल ८० रुपयांवर पोहोचला आहे. प्रत्येक बिलामागे वहन आकार, स्थिर आकार असे वेगवेगळे आकार आता वीज ग्राहकांना डोईजड होत आहेत. या छुप्या वीज दरवाढीने तब्बल ४० टक्क्यांवर वाढ पोहोचल्याने सामान्य ग्राहकांचे वीज बिल मात्र दिवाळीत अचानक वाढल्याचे बघून वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Customers should look at the electricity payment carefully | ग्राहकांनी वीज देयक काळजीपूर्वक बघणे गरजेचे

ग्राहकांनी वीज देयक काळजीपूर्वक बघणे गरजेचे

Next
ठळक मुद्देजागो ग्राहक जागो : स्थिर आकार ८० रुपयांवर!, महावितरणची जनतेच्या खिशाला कात्री

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महावितरण कंपनी जनतेच्या खिशाला 'फटाके' लावत आहे. वेगवेगळ्या आकाराच्या माध्यमातून बेमालूमपणे वीज दरवाढ करण्यात आली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात ५५ रुपयांवर असलेला स्थिर आकार आता तब्बल ८० रुपयांवर पोहोचला आहे. प्रत्येक बिलामागे वहन आकार, स्थिर आकार असे वेगवेगळे आकार आता वीज ग्राहकांना डोईजड होत आहेत. या छुप्या वीज दरवाढीने तब्बल ४० टक्क्यांवर वाढ पोहोचल्याने सामान्य ग्राहकांचे वीज बिल मात्र दिवाळीत अचानक वाढल्याचे बघून वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
महावितरणकडून प्रत्येक महिन्यात आलेल्या वीज बिलांचे बारकाईने वाचन करा. सदर बिलात स्थिर आकार या महिन्यापासून म्हणजे आॅक्टोबर २०१८ पासून १५ रुपयांची वाढ करून तब्बल ८० रुपये केला आहे. यापूर्वी एका नवीन आकाराची भर टाकली होती. त्यानवीन आकाराचे नाव आहे, वहन आकार यामध्ये १ रुपये १८ पैसे आकारामुळे मागील बिलाच्या एकुण ३५ ते ४० टक्क्यांनी वीज बिलात वाढ झालेली आहे. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता आकार वाढवून महावितरण कंपनी अक्षरश: आपली दिशाभूल करत आहे व आपण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. याविरोधात कोणी आवाज उठवेल का? महावितरणने अचानक केलेली वाढ आपणास परवडणारी आहे का? विचार करण्याची वेळ आली आहे.
या दर वाढविरोधात आवाज उठवला नाही तर ठरावीक अंतराने नवनवीन आकारात भर पडतच राहणार आहे. दरम्यान, दरमहा वीज बिले बारकाईने वाचणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रात वीज दर आहेत. ०-१०० वापराला प्रत्येक युनिटला ३ रुपये तर यापुढे १०१ ते ३०० युनिटपर्यंत ६ रुपये ७३ पैसे तर ३०१ ते ५०० युनिटपर्यंत ९ रुपये ७५ पैसे असे दर लादण्यात येत आहेत.
तर दुसरीकडे दिल्ली शहरात ० ते २०० युनिट वीज वापरासाठी केवळ २ रुपये युनिट तसेच २०० युनिटवर २ रुपये ९७ पैसे जनतेला दिलासा देणारा दिल्ली सरकारचा ४०० युनिटपर्यंत जे काही बिल येते, त्यात ५० टक्के बिल माफ, म्हणजेच महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी आपल्याला तब्बल २ हजार ९०० मोजावे लागतात.
तर दिल्लीवाले भरतात केवळ १ हजार १०० रुपये. दिल्लीतील ग्राहकांच्या तिप्पट रक्कम महावितरण जनतेच्या खिशातून उकळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे 'जागो ग्राहक जागो' महाराष्ट्रातील भाजप सरकारचे भरमसाठ लाईट बिल भरण्यास सर्व ग्राहक बहिष्कार टाकण्याच्या मन:स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. वीज दरवाढीमुळे अनेकांचा संताप अनावर झाला असून लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
आपण कधी वीज बिल बारकाईने बघता का?
स्थिर आकार - मार्च - २०१७ मध्ये रु.- ५५.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१७ मध्ये रु.- ५९.००
स्थिर आकार - मे - २०१७ मध्ये रु. - ६०.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१८ मध्ये रु. ६२.००
स्थिर आकार - मे - २०१८ मध्ये रु. ६५.००
आणि आॅक्टोबर - २०१८ मध्ये १५ रुपयांनी वाढ करून ८० रुपये केला आहे.

Web Title: Customers should look at the electricity payment carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.