बँक खाते नसणाऱ्या ग्राहकांनाही आता दुसऱ्याच्या खात्यावर पैसे पाठवता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 10:01 PM2020-12-21T22:01:51+5:302020-12-21T22:05:18+5:30

Bhandara News money Post Officeआता ग्राहकांचे खाते नसतानाही दुसऱ्याच्या खात्यावर कोणालाही आता पैसे पाठवता येणार आहेत.त्यासाठी आता डोमेस्टिक मनी ट्रान्सफर सेवा सुरू करण्यात आली आहे.

Customers who do not have a bank account can now send money to another account | बँक खाते नसणाऱ्या ग्राहकांनाही आता दुसऱ्याच्या खात्यावर पैसे पाठवता येणार

बँक खाते नसणाऱ्या ग्राहकांनाही आता दुसऱ्याच्या खात्यावर पैसे पाठवता येणार

googlenewsNext
ठळक मुद्देऑनलाइनच्या जमान्यात पोस्टाची सरशीभंडारा शहरात डोमेस्टिक मनी ट्रान्सफर सेवा सुरू

 लोकमत न्यूज नेटवर्क 

संतोष जाधवर

भंडारा: अनेकजण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपले गाव, आपला जिल्हा सोडून इतर जिल्ह्यासह राज्याबाहेर नोकरीनिमित्ताने जातात. मात्र अशावेळी आपल्या कुटुंबीयांना पैसे पाठवण्यासाठी कोणत्यातरी बँकेत आपले खाते असणे आवश्यक असते. मात्र आता ग्राहकांचे खाते नसतानाही दुसऱ्याच्या खात्यावर कोणालाही आता पैसे पाठवता येणार आहेत.त्यासाठी आता डोमेस्टिक मनी ट्रान्सफर सेवा सुरू करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या डोमेस्टिक मनी ट्रान्सफर सेवा योजनेअंतर्गत ही सेवा आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच परप्रांतातून जिल्ह्यात आलेल्या मजूर तसेच नोकरदारांना याचा मोठा लाभ होणार आहे. अशी माहिती पोस्टाचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे व्यवस्थापक वैभव बुलकुंदे यांनी दिली. डोमेस्टिक मनी सेवा आयपीपीबी खातेदार नाहीत त्यांनाही वापरता येते. ज्यांच्याकडे रोख रक्कम आहे व त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना अथवा अन्य मित्रपरिवाराला बँक खात्यात पाठवायचे आहेत ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खासदार नसतानाही त्यांना पैसे पाठवता येणार आहेत. यामध्ये दोन प्रकारे पैसे पाठवता येणार आहेत यात लो केवायसी विदाऊट पॅन व फुल्ल केवायसी विथ पॅन असे दोन प्रकार आहेत. यामध्ये लो केवायसी विदाऊट पॅनमधून ग्राहकाला एक व्यवहार ५००० तर दिवसाला २५ हजार रुपये पाठवता येणार आहेत. फुल केवायसी विथ पॅनमधून ग्राहकाला एक व्यवहार २५००० तर दिवसाला ४९ हजार ९९९ रुपये इतर बँक खात्याला पाठविता येणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त १० रुपये किंवा एकूण रकमेच्या एक टक्का यापैकी जी जास्त रक्कम असेल ती घेतली जाणार आहे. ज्या ग्राहकांना पन्नास हजारापर्यंत रोख रक्कम पाठवायची आहे तेही या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहे.

व्हर्च्युअल डेबिट कार्डची सुविधा

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ग्राहकांच्या सोयी-सुविधांसाठी व्हर्च्युअल डेबिट कार्डची सेवा नुकतीच १५ डिसेंबरला सुरू केली आहे. प्रत्यक्ष वास्तविक कार्ड नसल्याने याला वर्च्युअल डेबिट कार्ड असे म्हणतात. यामधून ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंग खरेदीची सुविधा मिळणार आहे. यामध्ये शॉपिंग, गुगल पे, मोबाईल बँकिंग, रक्कम ट्रान्सफर करणे रिचार्ज करणे अशा अनेक सुविधा मिळणार आहेत. याशिवाय विद्याथ्र्थार्ंना नोकरीसाठी किंवा शाळा महाविद्यालयाच्या अर्जाची फी ऑनलाइन भरता येणार आहे.

सेवानिवृत्तीधारकांची कायमची फरपट थांबली

सरकारी सेवा केल्यानंतर आयुष्याच्या अखेरीस उतारवयात पेन्शन हाच निवृत्त कर्मचाऱ्यांना जगण्यासाठी मोठा आधार ठरतो. मात्र ही पेन्शन नियमित सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हयातीचा दाखला देणे सेवानिवृत्ती धारकांना बंधनकारक आहे. मात्र उतारवयात वाढत जाणारे आजार आणि विविध समस्यांमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना हा दाखला संबंधित विभागाला देणे बरेचदा अडचणीचे होते. वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र आता पोस्ट कार्यालयातून घरात बसूनच हयातीचा दाखला देण्याची सुविधा जीवन प्रमाण योजनेअंतर्गत सुरू झाल्याने सेवानिवृत्ती धारकांची कायमची फरपट थांबली आहे.

पोस्ट कार्यालयामार्फत नागरिकांना विविध चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. यात सेवानिवृत्तांना आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात जीवन प्रमाणपत्र पाहिजे असल्याचे सांगितल्यानंतर पोस्टमन घरी येऊन हा दाखला पाच मिनिटात देतो. याशिवाय इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत विविध योजनांचा लाभही दिला जात आहे.

डाक उपअधीक्षक,भंडारा अरविंद गजभिये

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत ग्राहकांना आता खाते नसतानाही पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंग सुविधा, व्हर्चुअल डेबिट कार्ड, डोमेस्टिक मनी ट्रान्सफर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याचा अधिक नागरिकांनी लाभ घ्यावा.

वैभव बुलकुंदे,

इंडिया पोस्ट पेमेंट बँक व्यवस्थापक, भंडारा

Web Title: Customers who do not have a bank account can now send money to another account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा