सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:32 AM2021-02-14T04:32:49+5:302021-02-14T04:32:49+5:30

नदीकाठावर पिंचिंग करण्यासाठी या झाडांची कत्तल करण्याची गरज नव्हती. ही झाडे नदी किनाऱ्यावर होती. त्यांच्यावर अनेक पक्ष्यांचे घरटेसुद्धा होते. ...

Cutting down trees in the name of beautification | सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल

सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल

Next

नदीकाठावर पिंचिंग करण्यासाठी या झाडांची कत्तल करण्याची गरज नव्हती. ही झाडे नदी किनाऱ्यावर होती. त्यांच्यावर अनेक पक्ष्यांचे घरटेसुद्धा होते. सौंदर्यीकरण करण्यासाठी निसर्गाची हानी होऊ नये. ही नैसर्गिक अधिवासात वाढलेली झाडे असून सौंदर्यीकरण करताना त्या झाडांची कत्तल न करता त्यांच्या सभोवताली पिंचिंग करून झाड वाचवता आले असते. केवळ २-३ झाडे कापल्याचे मुख्याधिकारी सांगतात. नियमानुसार, नगरपालिका क्षेत्रातील कुठलेही झाड कापण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची परवानगी लागते. ही झाडे कापण्याअगोदर मुख्याधिकारी यांची परवानगी घेतली गेली का, याविषयी त्यांनी हा कामाचा भाग असून अशा वेळेस, जेव्हा ठरावात परिसराची क्लिनिंग करून त्यांचे सौंदर्यीकरण करण्याचे ठरल्याने अशा वेळेस झाडे कापण्यास कोणतीही परवानगी लागत नसल्याचे सांगितले. शास्त्रीनगर येथेही रस्त्याच्या कडेला असलेले मोठे वृक्ष कापले गेले. नियमानुसार, नदीकाठावरील २० मीटरच्या आत झाडांची कापणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी लागते. मात्र या प्रकरणात जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी घेतली गेली नाही. जिल्हाधिकारी या प्रकरणी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: Cutting down trees in the name of beautification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.