सायबर क्राईमने नकळत गुन्हा होतो
By Admin | Published: September 25, 2015 12:15 AM2015-09-25T00:15:47+5:302015-09-25T00:15:47+5:30
आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. चांगले नागरिक तयार करण्यासाठी शिक्षकांना खूप मेहनत करावी लागते.
कायदेविषयक मार्गदर्शन : साकोलीत कार्यक्रम
साकोली : आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. चांगले नागरिक तयार करण्यासाठी शिक्षकांना खूप मेहनत करावी लागते. आजच्या आधुनिक काळात मोबाईल, इंटरनेटच्या काळात सायबर क्राईमने नकळत गुन्हा होतो. कितीतरी विद्यार्थी सायबर क्राईम अंतर्गत गुन्हेगार बनतात. ही बाब थांबली पाहिजे, असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश एम. व्ही. बुराडे यांनी केले.
स्थानिक कृष्णमुरारी कटकवार विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते. कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक एम. व्ही. बुराडे, प्रमुख अतिथी अॅड. भुरले, अॅड. मरस्कोल्हे, अॅड. किशोर घोडीचोर, प्राचार्य प्रकाश मस्के, प्रा. संजय पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले. केअर अँड प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रेन अॅक्ट २००० अंतर्गत विद्यार्थ्यांना कायदयाची जाणीव व्हावी या उद्देशाने तालुका न्यायालयातर्फे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शक व अतिथींनी विद्यालयातील क्रीडा विभागाला भेट देवून विविध उपक्रमाची स्तृती केली. संचालन व आभार क्रीडासंघटक शाहिद कुरैशी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)