कोरोना संसर्ग काळात आबालवृध्दात सायकलींगची क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 05:00 AM2020-10-12T05:00:00+5:302020-10-12T05:00:13+5:30

चार दशकापूर्वी सायकल प्रतिष्ठेची होती. परंतु दुचाकींची संख्या वाढली. सहज कर्ज उपलब्ध होत असल्याने अनेकांनी दुचाकी खरेदी केली. शहरीच नव्हे तर ग्रामीण भागात प्रत्येकाकडे आता दुचाकी आहे. कोणतेही काम असले की, दुचाकीला किक मारली की, निघायचे असा नित्य क्रम झाला होता. परंतु गत सहा महिन्यात हे चित्र बदलले. कोरोना संसर्गामुळे प्रत्येकजण आपल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देवू लागले. सायकलींग हा सर्वात चांगला व्यायाम आहे.

Cycling craze in young and old during corona infection | कोरोना संसर्ग काळात आबालवृध्दात सायकलींगची क्रेझ

कोरोना संसर्ग काळात आबालवृध्दात सायकलींगची क्रेझ

Next
ठळक मुद्देपहाटे रस्त्यांवर गर्दी : शहरी आणि ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या सायकली आल्या बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाने संपूर्ण जीवन बदलून टाकले आहे. कधीकाळी अडगळीत टाकलेल्या सायकली आता कोरोना संसर्गाच्या काळात बाहेर काढून भल्या पहाटे आबालवृध्द रपेट मारत असल्याचे चित्र भंडारा शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही दिसून येत आहे. पर्यावरणपूरक सायकलीचा वापर व्यायामासाठी केला जात आहे.
चार दशकापूर्वी सायकल प्रतिष्ठेची होती. परंतु दुचाकींची संख्या वाढली. सहज कर्ज उपलब्ध होत असल्याने अनेकांनी दुचाकी खरेदी केली. शहरीच नव्हे तर ग्रामीण भागात प्रत्येकाकडे आता दुचाकी आहे. कोणतेही काम असले की, दुचाकीला किक मारली की, निघायचे असा नित्य क्रम झाला होता. परंतु गत सहा महिन्यात हे चित्र बदलले. कोरोना संसर्गामुळे प्रत्येकजण आपल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देवू लागले. सायकलींग हा सर्वात चांगला व्यायाम आहे. त्यामुळे आता अनेकजण सायकली घेवून तीन ते पाच किमीची परेट मारताना दिसून येतात.
भंडारा शहरातील प्रत्येक रस्त्यावर अनेकजण सायकली घेवून सकाळी दिसतात. यात लहान मुलांपासून ते वृध्दापर्यंत आणि तरुणींचा समावेश असतो. शहरातील खात रोडवर तर सकाळी १०० ते १५० सायकलस्वार पहाटे रपेट मारत असल्याचे चित्र दिसून येते. यात श्रीमंतापासून ते सर्व सामान्यांपर्यंत सर्वांचाच समावेश असतो.
नियमित सायकलींग करणारे नगरसेवक मंगेश वंजारी म्हणाले, मी पुर्वीपासूनच सायकलींग करतो. परंतु कोरोना काळात मोठ्या प्रमाणात नागरिक सायकल चालवून शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देत आहेत. सायकलींगचा वापर शरीर तंदुरुस्तीसोबतच दैनंदिन व्यवहारासाठी केल्यास पर्यावरणासाठी मोठा हातभार लागणार आहे. सायकलमुळे कोणतेही प्रदुषण होत नाही. पैशाचीही बचत होते आणि आपसूकच व्यायामही होतो, असा चौफेर फायदा सायकलींगने होत असल्याचे त्यांचे सांगितले.
शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातील डांबरी रस्त्यावर तरुणांचे जत्थे सायकलींग करताना दिसून येतात. अडगळीत पडलेल्या सायकली दुरुस्त करण्यात आल्या आहेत. तर काहींनी नवीन सायकली विकत घेतल्या. लॉकडाऊनच्या काळात सायकलला मोठी मागणी असल्याचे येथील सायकल विक्रेते सांगतात.

सायकलची मागणी वाढली
कोरोना काळात सायकलींगकडे मोठा कल दिसत आहे. परिणामी नवीन सायकली खरेदीकडे कल वाढला आहे. साधारणत: तीन हजारापासून ते दहा हजारापर्यंत सायकल विकत घेतली जाते. काहींच्या सायकलींची किंमत लाखाचा घरात आहे.

Web Title: Cycling craze in young and old during corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.