दुधाचे दर घटल्याने दूग्ध उत्पादक शेतकरी सापडला संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:20+5:302021-06-21T04:23:20+5:30
बॉक्स प्रचंड मागणी असतानाही दुधाचे दर घटलेलेच कसे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव प्रत्येक व्यवसायावर दिसून येत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोरोनाच्या ...
बॉक्स
प्रचंड मागणी असतानाही दुधाचे दर घटलेलेच कसे
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव प्रत्येक व्यवसायावर दिसून येत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोरोनाच्या सुरुवातीच्या कालखंडापासून ते आजपर्यंत जिल्ह्यात, राज्यात दुधाची प्रचंड मागणी वाढली आहे. अनेकजण आरोग्याच्या दृष्टीने रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आहारामध्ये दुधाचा वापर करीत आहेत. सध्या हॉटेल, चहा टपऱ्या, पान ठेले, बेकरी व्यवसाय सुरू झाले असल्याने दुधाच्या पदार्थांची मागणीही वाढली आहे. दुधाच्या पावडरचे दरही किलोमागे वाढले आहेत, तर दुसरीकडे दुधाच्या दरात कपात होत आहे. यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पश्चिम महाराष्ट्रात होणारी शेतकरी संघटनेचे आंदोलनेही अद्याप झाली नसल्याने शासनानेही याकडे लक्ष दिले नाही. आज विदर्भातही मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. मात्र, वाढत्या समस्यांमुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यासाठी शासनाने दुधाचे दर वाढविण्याची गरज आहे.
कोट
दुधाच्या दरामध्ये दिवसेंदिवस कपात होत आहे, तर दुसरीकडे पशुखाद्याचे दर मात्र वाढत चालले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पॅकिंगमधील दूध महाग विकले जाते. मात्र, शेतकऱ्यांनाच प्रतिलीटर दुधाचा तोटा सहन करावा लागत आहे.
दीपक गिरीपुंजे, दूध उत्पादक, शेतकरी
कोट
कोरोनाचे कारण सांगत अनेकदा दुधाच्या दरात कपात केली गेली. मात्र, अशाही कालखंडात आम्ही कमी दराने दूध विक्री केली. मात्र, आता लॉकडाऊन नसल्याने सर्वच व्यवसाय सुरू होऊनही शासनाने दुधाचे दर अद्याप वाढवलेले नाहीत. दूध उत्पादक शेेतकर्यांचे नुकसान होत असल्याने दुधाचे दर वाढविण्याची गरज आहे.
धनराज आकरे, दूध उत्पादक शेतकरी.