भारत-तिबेट मैत्री संघाच्या वतीने दलाई लामा यांचा जन्मदिवस उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:23 AM2021-07-09T04:23:21+5:302021-07-09T04:23:21+5:30
अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आशु गाेंडान्ने होते. प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, मनाेहर गणवीर, भारत-तिबेट मैत्री संघाचे ...
अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आशु गाेंडान्ने होते. प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, मनाेहर गणवीर, भारत-तिबेट मैत्री संघाचे राज्य महासचिव अम्रुत बन्साेड, महादेवराव मेश्राम, मन्साराम दहिवले, प्रा. अर्जुन गाेडबाेले, मनीष वासनिक आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दलाई लामा यांच्या कार्याचा गौरव केला. जगात शांतता नांदावी व मानवता टिकावी म्हणून दलाई लामा भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानाचा जगभर प्रचार व प्रसार करून भारताचा ध्वज उंच फडकावत आहेत. त्यामुळे त्यांच्या या महत्तम कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांचा भारतरत्न पुरस्काराने गाैरव करावा तसेच भारतीय संसद व महाराष्ट्र विधिमंडळात त्यांना पाचारण करून त्यांच्या अनमाेल विचाराचा लाभ घ्यावा, अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली.
संचालन भारत-तिबेट मैत्री संघाचे उपाध्यक्ष गुलशन गजभिये, प्रस्ताविक सचिव प्रा. एम. पी. गेडाम यांनी केले. आभार व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रकल्प अधिकारी नेमिता राहाटे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता आहुजा डाेंगरे, प्रा. सचिन गभणे, प्रा. नीतेश शहारे, प्रा. मडके व व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.