दमदार पावसामुळे रोवणीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:51 AM2017-07-27T00:51:13+5:302017-07-27T00:51:55+5:30

वरूण राज्याच्या आशिर्वादाने सर्वत्र पर्जन्यवृष्टी होत आहे. शेतात रोवणीचे कामे जोमात सुरू आहेत.

damadaara-paavasaamaulae-raovanaicayaa-kaamaannaa-vaega | दमदार पावसामुळे रोवणीच्या कामांना वेग

दमदार पावसामुळे रोवणीच्या कामांना वेग

Next
ठळक मुद्देमजुरांना रोजगार : साकोली तालुक्यात खरीप हंगाम

शिवशंकर बावनकुळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : वरूण राज्याच्या आशिर्वादाने सर्वत्र पर्जन्यवृष्टी होत आहे. शेतात रोवणीचे कामे जोमात सुरू आहेत. प्रत्येक शेतकºयाने आपल्या शेतात रोवणी सुरू केल्याने त्यांच्या घराचे दार बंद दिसत असून गावात शुकशुकाट दिसत आहे.
शेतीच्याकामात सहपरिवार शेतकरी लागला असून शेतशिवारात काम करणाºया स्त्री पुरूषांसह अबालवृद्ध रोवणीच्या कामात व्यस्त झाले आहे. एकीकडे गावात दिवसभर शांत वातावरण तर दुसरीकडे शेतात काम आणि मनोरंजन दोन्ही सोबत चालत आहेत. शेतशिवारात बघितल्यास कुठे ट्रॅक्टरचा आवाज कुठे नांगर हाकणारा बैलाचा मागे पाऊल चालत आहे. कुणी पाळ कोपरते तर कुणी पºहे खोदत आहे.
यात प्रमुख शेतकरी नांगरणी आणि चिखलणीच्या कामात, मुलगा कुदळ घेऊन बांधीचे खोपरे खोदताना तर म्हातारे वडील पºहे खोदताना दिसत आहेत. काही मोठे शेतकरी ट्रॅक्टरने चिखलणी करताना किंवा करवून घेताना दिसत आहेत. सकाळी ६ वाजेपासून तर सायंकाळी ७ वाजतापर्यंत चिखलणीच्या कामाची लगबग सुरू असून रोवणाºया महिला शेतात हजर होईपर्यंत चिखल तयार झाला पाहिजे याची एक लगबग शेतात दिसून येत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत घरची प्रमुख महिलासगळ्यांची शिदोरी घेऊन येते आणि सकाळपासून चिखलाच्या कामात व्यस्त असलेल्या लोकांना जेवायला देते. यावेळी शेतात भरपोट जेवण करण्याचा आनंद काही वेगळाच असतो जेवण झाल्यावर थोडा वेळ विसावा नंतर लगेच पुन्हा कामाला सुरवात होते.
पºहांच्या पेंढ्या चिखलात टाकणे आणि उर्वरित चिखलणीची पुन्हा तयारी करणे दुसरीकडे महिला मोठ्या उत्साहाने आपली उर्जा वापरत भात रोवणी करू लागत आहेत. चिखलात रोपे लावनू रोवणी करणे महिलाचे नित्यक्रम बनले आहे. दिवसभर चिखलात थकून परिश्रम करूनही दुसºया दिवशी सकाळी जागे होऊन पुन्हा शेतीच्या कामासाठी तयार राहणे हा क्रम सुरूच राहतो.

Web Title: damadaara-paavasaamaulae-raovanaicayaa-kaamaannaa-vaega

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.