लाखांदूर तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:40 AM2021-02-20T05:40:43+5:302021-02-20T05:40:43+5:30
खरीप हंगामात पूर परिस्थिती व कीड रोगाने पिकांची हानी झाल्याने उत्पादकतेत घट झाली. अशातच मागील हंगामातील पीकहानी भरून काढण्यासाठी ...
खरीप हंगामात पूर परिस्थिती व कीड रोगाने पिकांची हानी झाल्याने उत्पादकतेत घट झाली. अशातच मागील हंगामातील पीकहानी भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी बियाण्याची पेरणी केली आहे. या पेरणीत विविध कडधान्य व गळीत धान्य बियाण्याचा समावेश आहे, तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तालुक्यातील काही भागांत वीट व्यवसाय केला जात आहे. या व्यवसायांतर्गत वीटनिर्मितीला प्रारंभ झाला असतानाच अचानक गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या रबी पिकांसह वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: तालुक्यात पेरणीखालील हरभरा पीक काढणीला आले असताना अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तथापि, उन्हाळी हंगामांतर्गत धान पऱ्हे व रोवणीदेखील अवकाळी पावसाने प्रभावित होण्याची भीती आहे.