भंडारा येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 09:51 PM2018-09-25T21:51:04+5:302018-09-25T21:51:21+5:30

वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटीत कामगार घोषित करून तशी नोंदणी सुरू करण्यात यावी, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह प्रमुख सहा मागण्यांसाठी भंडारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

Damage to newspaper vendors at Bhandara | भंडारा येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचे धरणे

भंडारा येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचे धरणे

Next
ठळक मुद्देउपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : असंघटित कामगार म्हणून नोंदणी करा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटीत कामगार घोषित करून तशी नोंदणी सुरू करण्यात यावी, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह प्रमुख सहा मागण्यांसाठी भंडारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. सायंकाळी शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन सोपविले.
गत १२-१३ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासाठी पाठपुरावा करीत आहे. शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळ न करता सर्वच असंघटीत कामगारांसाठी महाराष्ट्र असंघटीत कामगार सुरक्षा मंडळाची घोषणा केली आहे. १६ जुलै रोजी नागपूर येथे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांना संघटनेचे शिष्टमंडळ भेटले.
त्यावेळी शिष्टमंडळाला मागण्यांविषयी आश्वासन दिले होते. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांनी ७ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतरही शासनाने दखल घेतली नाही.
अखेर मंगळवारला वृत्तपत्र विक्रेत्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवशीय धरणे आंदोलन केले. सायंकाळीच्या सुमारास शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन सोपविले.
आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष किशोर मोरे, विजय निर्वाण, अरविंद शेंडे, नरेंद्र गौरी व पदाधिकारी यांच्यासह विशाल रणदिवे, केशव कुंभरे, वासुदेवे चोले, सुखदेव गोंधोळे, विलास केझरकर, शैलेश नाटकर, हेमंत निमजे, अजय मेश्राम, विश्वास कुंभरे, आहुजा डोंगरे, अरविंद शेंडे, चंद्रकांत श्रीकोंडवार, उमाकांत बारापात्रे, अनिल कोरे, कुंडलीक हिवसे, नितीन खोब्रागडे, रवि साठवणे, माणिकचंद टेंभरे, संजिव थोटे, देवेंद्र बानेवार, शंकर शरणागत, गिरीधर चवळे, राकेश गजभिये, देविदास मेश्राम, विजय पटले, युवराज गजभिये, मंगेश गजभिये यांच्यासह जवळपास ९० वृत्तपत्र विक्रेत्यांचा सहभाग होता.

Web Title: Damage to newspaper vendors at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.