सदोष जलवाहिनीमुळे दूषित पाणीपुरवठा
By admin | Published: January 7, 2017 12:30 AM2017-01-07T00:30:37+5:302017-01-07T00:30:37+5:30
पवनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या पालोरा आबादी येथील सदोष जलवाहिनीमुळे दुषित पाणी पुरवठा होत आहे.
पालोरा येथील प्रकार : पाण्याचा अपव्यय
निश्चित मेश्राम पालोरा (चौ.)
पवनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या पालोरा आबादी येथील सदोष जलवाहिनीमुळे दुषित पाणी पुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका जनतेला बसत आहे.
दोन वर्षापुर्वीच ही पाईप लाईन नव्याने टाकण्यात आली होती. मात्र मागील १ वर्षापासून ठिकठिकाणी पानी लिकेज होत असल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. सर्व ग्रामस्थ याच नळयोजनेचा पाणी पिण्याकरिता वापरत आहेत.
पालोरा हे गाव दोन हजार लोकवस्तीचे आहे. येथील सरपंच संगीता गिऱ्हेपुंजे यांच्या हिटलरशाहीपणामुळे ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने ही ग्रामपंचायत जिल्ह्यात गाजत असते. मागील दोन वर्षापुर्वीच लक्षावधी रुपये खर्च करुन पाण्याची टाकी बनविण्यात आली. ग्रामस्थांना शुध्द व स्वच्छ पाणी मिळेल म्हणून हमी देण्यात आली होती. मात्र या नळयोजनेचे पाईप निकृष्ठ दर्जाचे टाकल्या गेल्यामुळे सुरुवातीपासून जागोजागी लिकेज होणे सुरु झाले होते. मात्र लोकप्रतिनिधी व कंत्राटदार यांनी संगणमत करुन काम पुर्ण झाले म्हणून कंत्राटदाराने हात वर केले.
नव्याने जलवाहिनी घालण्यात विरोध
दोन वर्षापुर्वी जी नळयोजना तयार करण्यात आली त्याच नळयोजनेवर ३ लक्ष रुपये खर्च करुन दुसरीकडे पाईप जोडण्याचे काम सुरु आहे. येथील सरपंचानी कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता पाईप लाईन टाकण्याचे काम कंत्राटदाराला दिला आहे. पुर्वी याच कंत्राटदाराने नळयोजनेचे काम केले होते. आता पुन्हा याच कंत्राटदाराला काम दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये शंका कूशंका व्यक्त केल्या जात आहे. कंत्राटदाराने आपल्या स्वमर्जीने जेसीबी मशीन लावून खोदकाम केले व पाईपलाईन टाकून बुजविण्यात आले. आतमध्ये पाईप कसे टाकण्यात आले, किती खोल नाली करण्यात आली हे कूणालाच माहिती नाही. कोणत्याही आधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधीने सुध्दा पाहणी केली नाही ही नळयोजना ग्रामस्थांना जिवदान देणार की मृत्यदान हेच लक्षात येत नाही. याबाबद ग्रामस्थांनी व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी लोकप्रतिनिधीबद्दल रोष व्यक्त केला आहे. हा काम त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.