न्याय मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचे धरणे

By admin | Published: March 31, 2016 12:54 AM2016-03-31T00:54:14+5:302016-03-31T00:54:14+5:30

विदर्भातील महत्वाकांक्षी इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्प परीसरातील राजीव गांधी टेकडीवर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने ....

Damages of project affected people for justice demands | न्याय मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचे धरणे

न्याय मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचे धरणे

Next

चिचाळ : विदर्भातील महत्वाकांक्षी इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्प परीसरातील राजीव गांधी टेकडीवर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने शेकडो प्रकल्पग्रस्तांनी धरणे आंदोलन केले. विविध समस्यांचे निवेदन तहसिलदार एस.डी. कांबळे व ठाणेदार मधुकर गिते यांना निवेदन देवून न्याय मागणी केली आहे.
गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत मौजा गोसेखुर्द व मौजा गोसी बु. या गावातील तसेच इतर गावातील भूमिसंपादन अधिनियम १८९४ नुसार संपादीत केलेल्या खातेदारांना १८ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार विशेष आर्थिक पॅकेजचा लाभ देण्यात यावा, प्रकल्पात पुनर्वसनासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादीत केली आहे. त्या शेतकऱ्यांना २०१३ चे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, तसेच कॅनलसाठी संपादीत केलेल्या शेतजमीन धारकांना ही २०१३ पॅकेजचा लाभ देण्यात यावा, पाथरी पुनर्वसनस्थळी रस्त्यावर आलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, पूर्व ले-आऊटचे मोजमापन करून सिमांकन करण्यात यावे, गावाला संपूर्ण तारेचा सुरक्षा कुंपण करण्यात यावे, पुनर्वसन स्थळी सोडलेली जमीन संपादित करून पाथरी गावाच्या उपयोगासाठी आणावी, धरणासाठी ज्या शेतातील माती आणलेली आहे, त्या शेतकऱ्यांना मोबदल्याचे पुनर्वसन २०१३ पॅकेजचा लाभ द्यावा, ज्या शेतकऱ्यांची उपजिवीका भागविणारी शेती प्रकल्पाच्या कुठल्याही कामासाठी शेती संपादित केली असेल किंवा जागा संपादित केली असेल त्या सर्व खातेदारांना पॅकेजचा लाभ देण्यात यावा, गोसेखुर्द परिसरातील सर्व वहिवाटीचे रस्ते दुरूस्त करून देण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांच्या दुरूस्तीला व उपलब्धतेला प्राधान्य देण्यात यावे व दुरूस्ती तात्काळ करण्यात यावी.
भुसंपादन प्रकरणातील मोबदला पुनर्वसन अनुदान, नागरिसुविधा व २०१३ च्या पॅकेजमधील वाटपाच्या अंमलबजावणीतील त्रृटीमुळे व प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांना योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने अनेक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना विनाकारण त्रास व मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
हा मनस्ताप संतापात व्यक्त होऊ शकतो याची वरिष्ठांनी नोंद घ्यावी आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.
धरणे आंदोलनाला गोसे परिसरातील चिचाळ, सौंदड, पाथरी, कुर्झा, वासेळा, मालची, पेंढरी, सावरला, नेरला आदी गावातील प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. धरणे आंदोलन सभेत विविध विषयार चर्चा करण्यात आली. विविध समस्यांचे निवेदन तहसिलदार एस.डी. कांबळे व ठाणेदार मधुकर गीते यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती संयोजक विलास भोंगाडे, दादा आगरे, शेखर रामटेके, गुलाब उके, सिताराम रेहपाडे, गुणवंत तागडे, शिवशंकर माटे, माणिक दुबे, शेखर मेश्राम, रमेश भेंडारकर, नरेंद्र बिलवणे, वामन भोयर, केशव नखाते, भिमराव भिमटे, सुदाम मेश्राम, राजानंद वानखेडे, पांडू चन्ने, गोमा भेंडारकर, परसराम काटेखाये, श्रीराम भेंडारकर, माधो आगरे, रामरतन काटेखाये, विनोद नखाते, केशव भुरे, राजु मेश्राम, देवराम मोहरकर आदी उपस्थित होते. यावेळी पवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मधुकर गीते यांचा कडक बंदोबस्त होता. (वार्ताहर)

Web Title: Damages of project affected people for justice demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.