लेंडेझरी तलावात विष प्रयोगाची भिती!

By admin | Published: April 10, 2017 12:32 AM2017-04-10T00:32:19+5:302017-04-10T00:32:19+5:30

लेंडेझरी गावाशेजारील तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. जंगलव्याप्त परिसर असल्याने वन्यप्राणी येथे तृष्णा भागविण्याकरिता येतात.

Danger in the londerer lake! | लेंडेझरी तलावात विष प्रयोगाची भिती!

लेंडेझरी तलावात विष प्रयोगाची भिती!

Next

वनप्राण्यांची तृष्णा भागविणारा एकमेव : शिकारी टोळीपासून धोका, तलावावर सहज प्रवेश
तुमसर : लेंडेझरी गावाशेजारील तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. जंगलव्याप्त परिसर असल्याने वन्यप्राणी येथे तृष्णा भागविण्याकरिता येतात. तलावात पाणी कमी असल्याने विष प्रयोगाची येथे शक्यता आहे. या तलावात कुणीही सहज प्रवेश करु शकते. तलावाची सुरक्षा ऐरणीवर आहे. चार वर्षापुर्वी येथे पाण्यात युरिया मिसळविण्यात आला होता. हे विशेष.
सातपुडा पर्वत रांगेत लेंडेझरी हे आदिवासी बहुल गाव आहे. घनदाट जंगल येथे आहे. स्वतंत्र लेंडेझरी वनपरिक्षाची निर्मिती राज्य शासनाने सन २००७ मध्ये केली होती. नागपूर जिल्ह्याच्या सीमा येथे भिडली आहे. पेंच प्रकल्पाकडे यामार्गाने जाता येते. लेंडेझरी गावाजवळ जंगलव्याप्त परिसरात गाव तलाव आहे. उन्हाळ्यात हे गाव तलाव नेहमीच कोरडे पडते. यावर्षीही तो कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहे. भिषण उन्हाळा सुरु झाला आहे. त्याचे चटके सध्या बसत आहेत.
सुमारे ६० ते ७० एकर परिसरात लेंडेझरी तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव तुडूंब भरला जातो, परंतु उन्हाळ्यात हा शेवटची घटका मोजतो. या तलावावर सहज वन्यप्राणी तृष्णा भागविण्याकरिता नियमित येतात. संपूर्ण लेंडेझरी जंगलात पाणवठे नाहीत. कृत्रिम पाणवठा एकही नाही केवळ वनविभागाला प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.अशी माहिती आहे. नैसर्गिक पाणवठे येथे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. बावनथडी प्रकल्प येथून चार किमी अंतरावर आहे. प्रकल्पात सहसा वन्यप्राणी तृष्णा भागविण्याकरिता जात नाहीत. संपूर्ण प्रकल्पाला दगडी पिचिंग केली असल्याने वन्यप्राणी प्रकल्पात उतरत नाही. प्रकल्पातून पाणी विसर्गस्थळी पाणीसाठा आहे. या पाणी साठ्यातून वन्यप्राणी तृष्णा भागवितात.परंतु येथे पर्यटक व मासेमांराची सतत वर्दळ असते. त्यामुळे दिवसभर वन्यप्राणी येथे फिरकत नाही.
लेंडेझरी तलाव गावाजवळून दिड ते दोन किमी अंतरावर आहे. या तलावाजवळ सहजा कुणी जात नाही. नितांत स्थळ असल्याने वन्यप्राणी येथे येतात. या संधीचा फायदा येथे शिकारी टोळी उन्हाळ्यात घेतात. यापूर्वी येथे तशा घटना घडल्या आहेत. चार वर्षापुर्वी तलावात एक खड्डा खोदून पाण्याचा हौद तयार केला होता. त्यात युरीया घालण्यात आला. हे पाणी चितळांनी ..... केले होते. तीन ते चार चितळांना तेव्हा मृत्यू झाला होता. पंरतु वनविभागाने रानकुत्र्यांचा हल्ल्यात चितळाचा मृत्यू झाल्याचे दाखविले होते. तशी चर्चा परिसरात होती. तलावात पाणी साठा अल्प असल्याने येथे धोक्याची मोठी शक्यता आहे. शिकारी टोळी या संधीचा शोधात असल्याची माहिती आहे. सध्या तलावाजवळ कुणीही प्रवेश करु शकतो. त्यामुळे धोक्याची मोठी शक्यता आहे. वनविभागाने किमान एक ते दोन आठवडे येथे तलावाच्या सुरक्षेकरिता सुरक्षा गार्ड तैणात करण्याची गरज आहे.
सध्या जलयुक्त शिवाराची धुम सुरु आहे. लेंडेझरी तलाव जलयुक्त शिवार अंतर्गत पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. तलाव खोलीकरण केल्याने उन्हाळ्यात येथे मुबलक पाणी साठीा राहण्याची शक्यता आहे. वन्यप्राण्यांकरिता ते नक्कीच वरदान ठरु शकते. वनविभागानेही तसा प्रस्ताव शासनाला सादर करण्याची गरज आहे. सध्या तरी तलाव कोरडा पडल्यानंतर वन्यप्राण्यांना पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ येणार असून जिवाला धोक्याची शक्यता आहे. आठ दिवसापूर्वी पाण्याच्या शोधाकरिता गावाशेजारी गाव कुत्र्यांनी हरणावर हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली होती. या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Danger in the londerer lake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.