वाघ दर्शनाने वाघिणीच्या दोन शावकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 05:00 AM2021-05-28T05:00:00+5:302021-05-28T05:00:48+5:30

चिखला गाव परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलातील तलावात बुधवारी सायंकाळी नर वाघ पाण्याच्या शोधात आला होता. पाणी प्राशन केल्यानंतर हा वाघ जंगलाच्या दिशेने निघाला. या प्रसंगाचे काही युवकांनी चित्रीकरण केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. वन विभाग यामुळे अलर्ट झाला. आठ दिवसांपूर्वी चिखला येथील जंगल परिसरात एक वाघीण व तिची दोन शावके येथे दिसली होती. याची दखल वन विभागाने घेतली होती.

Danger to two tiger cubs by tiger sighting | वाघ दर्शनाने वाघिणीच्या दोन शावकांना धोका

वाघ दर्शनाने वाघिणीच्या दोन शावकांना धोका

Next
ठळक मुद्देवन विभाग अलर्ट : चिखला परिसरात संचार

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील चिखला गावाजवळ जंगलव्याप्त परिसरात एका तलावात बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक नर वाघ दिसला. काही हौशी युवकांनी वाघाचा व्हिडिओ तयार केला.  हा सुखद क्षण आहे; परंतु आठ दिवसांपूर्वी वाघीण व तिच्या दोन शावकांचा याच परिसरात संचार असल्याचे पुढे आले होते.  आता शावक या नर वाघाचे नसतील तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. वाघाच्या दर्शनाची दखल वन विभागाने  घेतली असून वाघीण व तिच्या दोन शावकांवर वन विभाग पाळत ठेवून आहे.
चिखला गाव परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलातील तलावात बुधवारी सायंकाळी नर वाघ पाण्याच्या शोधात आला होता. पाणी प्राशन केल्यानंतर हा वाघ जंगलाच्या दिशेने निघाला. या प्रसंगाचे काही युवकांनी चित्रीकरण केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. वन विभाग यामुळे अलर्ट झाला. आठ दिवसांपूर्वी चिखला येथील जंगल परिसरात एक वाघीण व तिची दोन शावके येथे दिसली होती. याची दखल वन विभागाने घेतली होती. आता त्याच परिसरात एक नर वाघ दिसल्याने वन विभाग खडबडून जागा झाला आहे.
जंगलात वाघ  तसेच अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने हे जंगल समृद्ध मानले जाते. या जंगलाच्या सीमेनंतर मध्यप्रदेशची सीमा सुरू होते. त्यामुळे वन्यप्राणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची शक्यता अधिक आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी अनेक किलोमीटरपर्यंत प्रवास करतात नर वाघ दिसल्याने तो बाहेरून आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. वनविभाग त्यावर पाळत ठेवून आहे.

वाघांच्या लाेकेशनचा शोध 
 चिखला जंगलामधील दिसलेला नर वाघ व वाघीण तसेच तिच्या दोन शावकांचे वास्तव्य या परिसरात आहे. वैज्ञानिकदृष्ट्या नर वाघाचे हे शावक नसले तर त्या दोन शावकांना या वाघापासून मोठा धोका आहे. वाघाच्या दर्शनामुळे नाकाडोंगरी वन विभाग अलर्ट झाला असून, वाघीण तिच्या  दोन शावकांच्या मागावर सध्या आहे. वाघाचे लोकेशन व  त्या  दोन शावकांचे सध्या लोकेशन कुठे आहे याचा शोध घेत आहे.

 

Web Title: Danger to two tiger cubs by tiger sighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.