धाबेटेकडीत प्रदूषणाने जनता त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:26 AM2018-01-19T00:26:20+5:302018-01-19T00:26:33+5:30

तालुक्यातील धाबेटेकडी येथे गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन कालव्याच्या साईटचे कार्यालय व मिक्स प्लान्ट आहे. ग्रामपंचायत धाबेटेकडीने आदिवासी व इतर समाजाचे वास्तव्य वाढले असून लोकांना आरोग्याला व मानसिक समस्या निर्माण झालेल्या आहेत.

Dangerous pollution caused public woes | धाबेटेकडीत प्रदूषणाने जनता त्रस्त

धाबेटेकडीत प्रदूषणाने जनता त्रस्त

Next
ठळक मुद्देलक्ष देण्याची गरज : धाबेटेकडी टोलीवर काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील धाबेटेकडी येथे गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन कालव्याच्या साईटचे कार्यालय व मिक्स प्लान्ट आहे. ग्रामपंचायत धाबेटेकडीने आदिवासी व इतर समाजाचे वास्तव्य वाढले असून लोकांना आरोग्याला व मानसिक समस्या निर्माण झालेल्या आहेत.
कंत्राट असलेल्या कंपनीने यांनी हेतुपुरस्पर धाबेटेकडी येथील टोलीवरील वस्तीची जागा अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. त्याचप्रमाणे सदर कंपनीने जवळपास दहा एकर जागेमध्ये बांधकाम करीत आहे. त्याप्रमाणे कंपनीने आदिवासीचे घरकुल कार्यालय म्हणून भाडेतत्वावर घेतलेला आहे. तसेच ग्रामपंचायतच्या हद्दीतील जागा परस्पर नाहरकत न घेता धाबेटेकडी व शिवनी येथे ४०० फुट बोअरवेलसुद्धा खोदलेली असल्याचा आरोप पंचायत समिती सभापती रवींद्र खोब्रागडे व पं.स. सदस्य पंकज श्यामकुंवर यांनी केला आहे.
सदर कंपनीने धाबेटेकडी येथील आदिवासी बांधवांना विाकसाचे खोटे आमिष दाखवून त्यांचे जागेवर अतिक्रमण केले आहे. कंपनीचे साईट प्लॉन्ट हे लोकवस्तीपासून किमान २ ते ३ कि़मी. असायला हवे. लोकवस्तीची जागा कंपनीला वापरण्यात दिली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
धाबेटेकडी टोलीवर अनेक कुटुंब वास्तव्य करीत असून शालेय विद्यार्थी शिक्षण घेत असतात. प्लॉन्टवरील कामामुळे वायुप्रदुषण व ध्वनीप्रदुषणाचा सामना लोकांना करावा लागतो. कंपनीतर्फे अतिक्रमण केलेल्या जागेमध्ये ग्रामपंचायत, धाबेटेकडी येथील शंकरपटाची नियोजित जागासुद्धा देण्यात आली असून तेथेही बांधकाम सुरू आहे.
संबंधित बांधकामासाठी येणारे मोठे वाहन रेती आणि गिट्टीची साठवण करीत आहेत. त्यामुळे पिंपळगाव सडक ते शिवनी मोगरा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झालेला असून साधारण दुचाकीसुद्धा व्यवस्थित जावू शकत नाही. लाभार्थी शेतकºयांना ३० लाख रूपये प्रमाणे जमिनीचा मोबदला देण्यात यावा तसेच स्थानिक मजुरांना ३०० रूपये प्रमाणे रोजी देवून काम देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे ग्रामस्थांनी केली.

Web Title: Dangerous pollution caused public woes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.