दुतर्फा झुडपांमुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:39 PM2017-09-28T23:39:25+5:302017-09-28T23:39:37+5:30

तामसवाडी ते सिलेगाव दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा लहान मोठी झाडे व झुडपी वाढल्याने वळणमार्गावर वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. रात्री तथा दिवसासुद्धा वाहन चालविणे कठीण झाले आहे.

Dangers of life threatens life due to bush shoots | दुतर्फा झुडपांमुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात

दुतर्फा झुडपांमुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात

Next
ठळक मुद्देतामसवाडी-सिलेगाव मार्गावरील प्रकार : समस्या दूर करा, अन्यथा आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तामसवाडी ते सिलेगाव दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा लहान मोठी झाडे व झुडपी वाढल्याने वळणमार्गावर वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. रात्री तथा दिवसासुद्धा वाहन चालविणे कठीण झाले आहे. एस.टी. चालकांनी सुद्धा बस कशी चालवावी असा प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित विभागाचे येथे दुर्लक्ष आहे काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
तामसवाडी (सि.) ते सिलेगाव रस्ता वर्दळीचा आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठी व लहान उंच गवत वाढला आहे. वळण मार्गावरून येणारे समोरील वाहन दिसत नाही. भरधाव वाहने या मार्गावरून धावतात. शाळकरी मुलांचा जीव येथे धोक्यात आला आहे. सुमारे तीन कि.मी. चा रस्ता धोकादायक ठरला आहे. बसचालकांनी याची तक्रार केली आहे. रस्त्याशेजारील वाढलेले गवत, झुडपी झाडे तात्काळ काढण्याची गरज आहे.
नियमानुसार रस्त्याशेजारी झुडपी वृक्ष तथा मोठे गवत, कचरा असता कामा नये. परंतु येथे नियमाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. या मार्गावरून ट्रक तथा इतर वाहने धावण्याची संख्या मोठी आहे. सायंकाळी व रात्री सायकलस्वारांना या मार्गावरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. रानडुकरांचा कळप अशा झुडूपात दडून बसला राहतो. रस्ता पार करताना वाहन चालकांना येथे अपघात घडले आहेत. वाहनधारकांची समस्या अनेक दिवसांपासून आहे. मात्र वेळकाढू धोरण अवलंबित आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ समस्या दूर करण्याची मागणी तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी केली आहे. अन्यथा नागरिकांसोबत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: Dangers of life threatens life due to bush shoots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.