मनपटलावरील अस्वस्थ जाणीवा प्रगट करण्याचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:18 PM2019-02-13T22:18:34+5:302019-02-13T22:18:56+5:30
‘प्रेम म्हणजे पे्रम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. प्रेमाची अनुभूती घेतली नाही असा कुणी आढळणार नाही. मात्र अलीकडे डे संस्कृतीत व्हॅलेंटाईनचा बोलबाला आहे. व्हॅलेंटाईन वीक साजरा करणाऱ्या तरुणाईला ओढ लागली आहे ती १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेची.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : ‘प्रेम म्हणजे पे्रम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. प्रेमाची अनुभूती घेतली नाही असा कुणी आढळणार नाही. मात्र अलीकडे डे संस्कृतीत व्हॅलेंटाईनचा बोलबाला आहे. व्हॅलेंटाईन वीक साजरा करणाऱ्या तरुणाईला ओढ लागली आहे ती १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेची. मनपटलावरील अस्वस्थ जाणीवांना कलात्मक पद्धतीने प्रगट करण्यासाठी तरुणाई आसुसली आहे.
गत काही वर्षांपासून महानगरात साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे गाव खेड्यापर्यंत पोहचला आहे. प्रेमाचे प्रगटीकरण करण्याचा हा हक्काचा दिवस खास तरुणाईत उत्साहाने साजरा होतो. अलीकडे व्हॅलेंटाईन सप्ताह साजरा होवू लागला आहे. ७ फेब्रुवारीपासून एकापाठोपाठ एक डे साजरे होत आहे. ७ फेब्रुवारीला रोझ डे, त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमीस डे, किस डे, हग डे साजरे होतात. आणि या सर्वांचा शेवट होतो व्हॅलेंटाईन डे ने.
तरुणाई वर्षभर या दिवसाची चातकासारखी प्रतिक्षा करीत असतात. जीवलगाचा प्रत्यक्ष होकार मिळविण्यासाठी कोणताही धोका नको म्हणून आदीपासून वातावरण निर्मीती केली जाते. जगभरात या दिवशी प्रेमाला भरते आलेले असते. शहरी तरुणाई या दिवशी उत्साहात दिसून येते. शाळा महाविद्यालयाचे वातावरणही गुलाबी होऊन जाते, असा हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी गुलाब पुष्पांची उधळण केली जाते. प्रेम म्हणजे केवळ प्रियशीसोबत असलेले नव्हे. तर आई, बहिण, भाऊ मित्र मैत्रीणी कुणीही असू शकतात. मनाचा हळव्या प्रितीला अलगदपणे उकलत जाणारा हा दिवस होय.
भारतीय संस्कृतीत अशा दिनाला फारसे महत्व नाही. परंतु जागतिकीकरण आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून आता हा दिवस गावखेड्यात पोहचला आहे. यातून अनेकदा भानगडी निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु प्रेमात सर्व काही क्षम्य असत.
गुलाब पुष्पांच्या रंगाचे महत्व
गुलाब पुष्प हा प्रेमाचे प्रतीक असले तरी त्याच्या रंगावरुन तो कुणाला दायचा हे ठरविले जाते. पिवळ्या रंगाचा गुलाब मित्र मैत्रिणींना दिला जातो. नारंगी रंगाचा गुलाब ज्या व्यक्तीकडे इच्छा व्यक्त करायची आहे त्याला. तर पांढरा गुलाब ज्या व्यक्तीला आपण दुखावले आहे त्याला आणि लाल रंगाचा गुलाब खास प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी दिला जातो.