पंतप्रधानांना पाठविला १७ रु.चा डीडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 10:13 PM2019-02-10T22:13:56+5:302019-02-10T22:14:15+5:30

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेल्या वार्षिक सहा हजार रुपये अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच होय. याचा निषेध म्हणून १७ रुपयांचा डिमांड ड्राफट मोहाडी तालुका शहर काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आला.

A DD of Rs 17 was sent to the Prime Minister | पंतप्रधानांना पाठविला १७ रु.चा डीडी

पंतप्रधानांना पाठविला १७ रु.चा डीडी

Next
ठळक मुद्देकाँग्रेसकडून सहा हजार रुपये घोषणेचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेल्या वार्षिक सहा हजार रुपये अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच होय. याचा निषेध म्हणून १७ रुपयांचा डिमांड ड्राफट मोहाडी तालुका शहर काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आला.
शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये म्हणजे प्रतिदिन १७ रुपये प्रती कुटूंब अशी ही मदत आहे. एवढ्या पैशात शेतकऱ्यांचा एक दिवस खरोखरच निघेल का, असा प्रश्न करुन ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच करने होय. एकीकडे खतांचे व बियाण्याचे भाव वाढविण्यात आले वरुन युरीया खताच्या गोनीत पाच किलो वजन कमी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला निवडणुकीत मोठमोठे आश्वासने दिलीत, संपुर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन सुद्धा दिले परंतु ते पुर्ण केले नाही.
शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यात यावा, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला दिडपट भााव दयावा, शेतकऱ्यांना २५ हजार रुपये तरी वार्षिक पेन्शन घावी या मागण्यासह शेतकऱ्यांना १७ रुपये प्रतिदिन देत असलेल्याचा निषेध करीत आहोत असे तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनात नमुद करणयात आले आहे.
निवेदन देताना तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभु मोहतुरे, शहर अध्यक्ष हरिराम निमकर, उपाध्यक्ष सुनील गिरीपूंजे, अमर रगडे, सिराज शेख, माजी नगराध्यक्ष स्वाती निमजे, प्रदिप वाडीभस्मे, अरुणा श्रीपाद, सुनिता सोरते, शोभा बुरडे, कविता बावणे, मिना निखारे, वंदना मेश्राम, महेश निमजे, देवेन्द्र इलमे, दुर्योधन अटराये, राजेश ठाकुर, गणेश बोंदरे, राजन सिंगनजुडे, गणेश निमजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: A DD of Rs 17 was sent to the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.