तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:33 AM2020-12-29T04:33:33+5:302020-12-29T04:33:33+5:30

फोटो २८लोक०५ पालांदूर : थर्टीफर्स्टच्या नावावर तरुणाई व्यसनाधीन होते. व्यसनाचा आधार मित्रांच्या संगतीने तयार होतो. या व्यसनाच्या पहिल्या पायरीत ...

De-addiction message to youth! | तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश!

तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश!

Next

फोटो २८लोक०५

पालांदूर : थर्टीफर्स्टच्या नावावर तरुणाई व्यसनाधीन होते. व्यसनाचा आधार मित्रांच्या संगतीने तयार होतो. या व्यसनाच्या पहिल्या पायरीत थर्टीफर्स्ट सारखे दिवस धोक्याचे असून तरुणांनी या दिवसात सजगता बाळगत व्यसनापासून दूर राहावे. असे आवाहन शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेचे संस्थाध्यक्ष डमदेव कहालकर यांनी पालांदूर व दिघोरी येथील तरुणांना केले.व्यसन मुक्ती करिता शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेचे संस्थाध्यक्ष डमदेव कहालकर यांनी तरुणाईला समुपदेशन करीत व्यसनमुक्तीची शपथ दिलेली आहे. यावेळी बहुसंख्येने तरुणाई क्रीडांगणावर उपस्थित होती.आयुष्य हे सुख-दुःखाचे भरलेले महासागर आहे. या महासागरात प्रत्येक जण सुखाकरिता तळमळतो आहे. सुख प्रत्येकालाच मिळू शकतो. मात्र या महासागरात सुसंगती घडणे महत्त्वाचे असते. जसा मित्र तसे त्याचे विचार व आचार घडतात. प्रत्येकाने संताच्या विचारांनी जगावे. थोर पुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदर्श जीवनाची वाटचाल करावी. याकरिता कहालकर यांनी समाज सुधारणेचा वसा घेतला आहे. ३१ डिसेंबरला तरुणाई नशेच्या आहारी जाऊन नववर्षाचे स्वागत करण्याकरता वाटेल ते करतात. त्यालाही कळत नाही की मी काय करतो. मित्रांच्या संगतीने चुकीच्या मार्गाने जातो. त्यातून व्यसन वाढत जाते. आणि आयुष्यात कधी न घेतलेला एकच प्याला आयुष्याला वेगळे वळण देऊन जाते. नेमके हेच होऊ नये, तरुणांनी वेळीच सावध व्हावे, भारतीय संस्कृतीचे आदर्श जोपासावा, नव्या जोमाने सकारात्मक विचारांची कास धरावी. असे ऊर्जात्मक विचार तरुणांना पुरवीत नववर्षाचे स्वागत हसत मुखाने प्रेरणादायी विचाराने तरुणाईला देत समाज कल्याणाचे कार्य डमदेव कहालकर गुरुजी यांनी केले आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील पोलीस स्टेशनच्या क्रीडांगणावर पोलिस भरतीपूर्व प्रात्यक्षिकासाठी असलेल्या तरुण-तरुणींना उस्फूर्तपणे व्यसनमुक्तीचे समुपदेशन करीत त्यांना व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालण्याची शपथ दिली

Web Title: De-addiction message to youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.