जंक फुड शरीराला घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 06:00 AM2020-01-26T06:00:00+5:302020-01-26T06:00:00+5:30
मुलांना कोणते पदार्थ खायला द्यावेत किंवा नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जंक फुड खाणे म्हणजे शरीराचा घात करण्यासारखे आहे. पिज्जा, बरगत, चायनिज अन्न पदार्थांचे सेवन दिवसेंगणिक घातक होत आहे. त्यांचे सेवन करून नये. जंक फुड शरीराला घातक आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एन.डी. मोहिते यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुलांना कोणते पदार्थ खायला द्यावेत किंवा नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जंक फुड खाणे म्हणजे शरीराचा घात करण्यासारखे आहे. पिज्जा, बरगत, चायनिज अन्न पदार्थांचे सेवन दिवसेंगणिक घातक होत आहे. त्यांचे सेवन करून नये. जंक फुड शरीराला घातक आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एन.डी. मोहिते यांनी दिली.
येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात मुलांना परिपूर्ण व पोषक आहार देण्याअंतर्गत माहितीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मोहिते बोलत होते. पटेल महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष व विज्ञान फोरम व प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या सहकार्याने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर अन्न व औषध प्रशासनाने वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी भाष्कर जी. नंदनवार, एस.एस. देशपांडे, पी.व्ही. मानवतकर, प्रा. डॉ. कार्तिक पनीकर, विज्ञान फोरमचे एस.डी. बोरकर आदी उपस्थित होते.
यावेळी मोहिते यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षीत व योग्य अन्न सेवनाबाबत मार्गदर्शन केले. एस.एस. देशपांडे यांनी हायफॅट सोडियम व शुगर असलेल्या अन्न पदार्थाच्या सेवनाच्या दुश्परिणामाबाबत माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी कडधान्य, चपाती, लिंबू, शरबत, फळे, नारळ पाणी याचे नियमित सेवन करावे, असा सल्लासुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आला. अन्न सुरक्षा, अन्न सुरक्षीतता तसेच महाविद्यालय हायजीन रेटिंगचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली. सदर कार्यशाळेला उपस्थित पाहुण्यांचे आभार जी.बी. तिवारी यांनी मानले.
कार्यशाळेसाठी श्याम डफरे, डॉ. अनंत मुळे, डॉ. सुनील झंजे, प्रा. यशपाल राठोड यांच्यासह अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचारी आयक्युएसीचे समन्वयक डॉ. पनीकर यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.