लसीकरणासाठी ज्येष्ठांच्या सेवेत दाेन बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 05:00 AM2021-03-21T05:00:00+5:302021-03-21T05:00:44+5:30
भंडारा शहरात काेराेना संसर्ग वाढायला लागला आहे; मात्र त्यानंतरही ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. यातील मुख्य अडचण म्हणजे लसीकरण केंद्रापर्यंत जाणे आणि तेथून घरी परत येणे हाेय. ही बाब नगर परिषदेच्या लक्षात येताच दाेन स्कूलबसची व्यवस्था करण्यात आली. आयुध निर्माणीने या दाेन बस नगर परिषदेला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लसीकरण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पाेहाेचण्यासाठी अडचण लक्षात घेता भंडारा नगर परिषदेने शनिवारपासून दाेन बसेस ज्येष्ठांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. वाॅर्डावाॅर्डातून वृद्धांना लसीकरण केंद्रावर आणून त्यानंतर घरीही साेडून दिले जात आहे. शहरातील नागरी प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरणाला प्रारंभ झाला असून, शनिवारी तब्बल २०० ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली.
भंडारा शहरात काेराेना संसर्ग वाढायला लागला आहे; मात्र त्यानंतरही ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. यातील मुख्य अडचण म्हणजे लसीकरण केंद्रापर्यंत जाणे आणि तेथून घरी परत येणे हाेय. ही बाब नगर परिषदेच्या लक्षात येताच दाेन स्कूलबसची व्यवस्था करण्यात आली. आयुध निर्माणीने या दाेन बस नगर परिषदेला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेस वाॅर्डावाॅर्डात जावून वृद्धांना लसीकरण केंद्रापर्यंत आणत आहेत. यासाठी त्या प्रभागाचे नगरसेवकांचे सहकार्य घेतले जात आहे, तसेच बस पाेहाेचल्यानंतर दवंडी देऊन नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले जाते.
भंडारा शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयानंतर नगर परिषदेच्या नागरी प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी वृद्धांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, शामियाना टाकण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था असून, तेथे दाेन स्वयंसेवक ज्येष्ठांना सहकार्य करीत आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. शनिवारी तब्बल दाेनशे नागरिकांना काेराेना लस देण्यात आली. नाेडल अधिकारी डाॅ. मनिषा कुंभारे यांच्या मार्गदर्शनात राहूल देशमुख, संग्राम कटकवार आणि नगर परिषदेचे कर्मचारी यासाठी सहकार्य करीत आहे.
प्रत्येक वाॅर्डात काेराेना चाचणी सुविधा
भंडारा शहरातील प्रत्येक वाॅर्डात राेटेशन पध्दतीनुसार काेराेना चाचणी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दरराेज एक हजार नागरिकांची चाचणी घेण्याचे उद्दिष्ट आहे. भंडारा शहरात वाढता काेराेना प्रादूर्भाव राेखण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला असून लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
ज्येष्ठ नागरिकाच्या लसीकरणासाठी नगर परिषदेने निशुल्क बसची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, यासाठी नगरसेवक सहकार्य करीत आहे. परिसरातील नागरिकांनीही पुढाकार घेवून वृध्दांना लसीकरणासाठी मदत करावी.
- विनाेद जाधव
मुख्याधिकारी भंडारा