बाबूजींची पुण्यतिथी : रक्तदान हेच श्रेष्ठदान -मेश्राम यांचे प्रतिपादन
By Admin | Published: July 3, 2015 12:59 AM2015-07-03T00:59:41+5:302015-07-03T00:59:41+5:30
लोकमतचे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ...
स्वेच्छा रक्तदानात अनेकांचा सहभाग
भंडारा : लोकमतचे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोकमत इव्हेंट ग्रुप व जीवन ज्योती ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शालवन स्पर्धा परीक्षा महाविद्यालयात आयोजित शिबिराला भंडारावासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. तत्पूर्वी बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी ब्लड बँकेचे डॉ. रवी भांगे, शालवनचे संचालक संदीप मेश्राम, संयोजक संदीप गजभिये, नितीन धकाते, कार्यालयप्रमुख मोहन धवड व प्रथम रक्तदाते आलोक खराटे, संजय नंदुरकर उपस्थित होते. प्रास्ताविक सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी तर संचालन बालविकास मंचचे जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे यांनी केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान ओळखपत्र, रक्तदान प्रमाणपत्र प्रथमोपचार पेटी व टी-शर्ट भेट स्वरुपात देण्यात आले. कार्यक्रमात ब्लड बँकेचे मोहम्मद जियाऊल हक, राहुल भगत, वैशाली लामसांगे, सुनिल सोनवाने, दिप्ती मायरल, विजय सयाम, अनिकेत कोलते, प्रफुल बोरकर, उमेश खंडाते, महेश वानखेडे, आकाश बागडे, नितेश मेश्राम, प्रियंका गजभिये, विकास बावनकुळे व स्रेहा वरकडे यांनी सहकार्य केले. यावेळी आलोक खराटे, संजय नंदुरकर, रामकृष्ण गायधने, ज्ञानेश्वर खोब्रागडे, सागर खेताडे, शुभम अंजतकर, निशिकांत जाने, हेमचंद्र सोनवाने, राजेंद्र नागपुरे, शरद गजभिये, प्रशांत धुर्वे, अरविंद सुर्यवंशी, दिलीप लेप्से, सचिन गजभिये, राकेश मेश्राम, रौनक पशिने, उमेश लांजेवार, राजेश धकाते, कमलेश धकाते, रतन वंजारी, राजू निनावे, दीपक राणे, संदीप नागदेवे यांनी रक्तदान केले.