भंडारा जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणानंतर बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:27 PM2018-12-19T12:27:20+5:302018-12-19T12:27:51+5:30
गोवर - रुबेला लस दिल्यानंतर प्रकृती बिघडून दीड वर्षाची चिमुकली दगावल्याची घटना जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या गर्रा बघेडा या गावी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोवर - रुबेला लस दिल्यानंतर प्रकृती बिघडून दीड वर्षाची चिमुकली दगावल्याची घटना जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या गर्रा बघेडा या गावी घडली.
१० तारखेला या गावातील बालकांना लस देण्यात आली होती. त्या मोहिमेत आशा रामसिंग गोळगे (दीड वर्ष) या बालिकेचाही समावेश होता. यावेळी तिचा मोठा भाऊ सरकम (३) यालाही लस दिली होती. लस दिल्यानंतर या दोन्ही बहिण भावाची प्रकृती अचानक बिघडली. दोघांनी ताप आला. त्यांना स्थानिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर चार दिवस उपचारही झाले. मात्र ताप कमी होत नसल्याने त्या दोघांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे आशाचे निधन झाले. या प्रकाराने तिचे पालक संतप्त झाले असून त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. तिच्या भावावर उपचार सुरू आहेत.