अल्पवयीन विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:39 AM2019-08-12T00:39:43+5:302019-08-12T00:40:16+5:30

तालुक्यातील खापा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. कृणाल सतिश क्षिरसागर वय (६) रा. खापा. असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

Death of a minor student | अल्पवयीन विद्यार्थ्याचा मृत्यू

अल्पवयीन विद्यार्थ्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देखापा येथील घटना : जंतनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर आला होता ताप

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील खापा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. कृणाल सतिश क्षिरसागर वय (६) रा. खापा. असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. विशेष म्हणजे कृणालने जंतनाशक गोळ्यांचे सेवन केल्यानंतर त्याला ताप आला होता.
खापा येथील शाळेत आरोग्य विभागामार्फत मंगळवारी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. त्या गोळ्यांचे सेवन कृणालने केले होते. यानंतर कृणालला बुधवारी ताप आला होता अशी प्राथमिक माहिती आहे. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारार्थ तूमसर यथील एका खाजगी रुग्णालयात प्रथम दाखल केले.
तिथून डॉक्टरांनी त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यास सांगितले. परंतू तिथेही त्याच्या प्रकृतीमध्ये सूधारणा होत नसल्याने त्याची प्रकृती आणखी खालावली असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला दिला.
नागपुरात त्याची रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. विद्यार्थ्यांचा मृत्यु कशामूळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, बालकाच्या अचानक मृत्यूने देव्हाडी आरोग्य विभाग खळबळून जागा झाला आहे. त्याच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Death of a minor student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.