दुर्दैवी! दोन चिमुकल्या भावंडांना झोपेतच सर्पदंश; उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू

By ज्ञानेश्वर मुंदे | Published: September 12, 2022 11:54 AM2022-09-12T11:54:46+5:302022-09-12T12:30:03+5:30

मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील घटना

death of two siblings sleeping at home due to snakebite, incidence at devada in Mohadi taluka | दुर्दैवी! दोन चिमुकल्या भावंडांना झोपेतच सर्पदंश; उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू

दुर्दैवी! दोन चिमुकल्या भावंडांना झोपेतच सर्पदंश; उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू

Next

भंडारा : घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द  येथे घडली. या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द  येथे धाव घेतली आहे. 

सुशील बलवीर डोंगरे (८) व  उत्कर्ष बलवीर डोंगरे  (११) असे मृत भावंडाचे नाव आहे. रविवारी रात्री ते एकाच बिछान्यावर झोपी गेले होते. रात्री मागच्या दारातून साप आत आला. तो बिछान्यावर चढला. त्या सापाने दोघाही भावानं दंश केला. काहीतरी चावल्याचा भास झाला. साप चावल्याचे माहित होताच दोघाही भावांना उपचारासाठी आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्या दोनही भावांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात  नेण्यात आले.  

भंडारा येथे उपचारादरम्यान थोरला भाऊ उत्कर्ष बलवीर डोंगरे यांचा रात्री १२.४५ वाजता मृत्यू झाला. तर भंडारा येथून धाकटा भाऊ सुशील बलवीर डोंगरे याला भंडारा येथून रात्रीच  नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा सोमवारी सकाळी ९.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे देव्हाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे.  या घटनेची माहिती होताच मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी  सकाळी  देव्हाडा खुर्द गाठले आहे.

Web Title: death of two siblings sleeping at home due to snakebite, incidence at devada in Mohadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.