लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवाच; जनजागृतीसाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 05:00 AM2021-05-31T05:00:00+5:302021-05-31T05:00:31+5:30

लसीकरणाच्या सुरुवातीच्या सत्रात ग्रामीण भागात लसीकरणासाठी प्रशासनाला जिवाचा आटापिटा करावा लागला. ग्रामीण भागात लसीकरणाने मृत्यू होतो, निपुत्रिकपणा होतो, अशी अफवाच पसरविण्यात आली.  त्याचा परिणाम लसीकरणावरही पडला. मात्र प्रशासनाने  आव्हान पेलले. निरंतर जनजागृतीमुळे ग्रामीण भागात ह्या सर्व बाबी अफवा आहेत हे पटवून देण्यात यश मिळविले असून शासनाने कठोर पावले उचलली आहेत.

Death by vaccination, rumors of infertility; Exercise for public awareness | लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवाच; जनजागृतीसाठी कसरत

लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवाच; जनजागृतीसाठी कसरत

Next
ठळक मुद्देग्रामीण भागात घडला सर्वाधिक प्रकार : सज्ञान होण्याची बाब अधिक गरजेची

इंद्रपाल कटकवार
लोकमत न्युज नेटवर्क
भंडारा : कोरोना महामारीवर लसीकरण हे एकमेव रामबाण उपाय आहे. मात्र, लसीकरणाने मृत्यू किंवा निपुत्रिक होण्याची अफवा ग्रामीण भागात सर्वाधिक ऐकावयास मिळाली ही निव्वळ अफवा असून नागरिकांनी यावर कुठलाही विश्वास ठेवू नये, अशी सकारात्मक जनजागृती शासन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. परंतू ही जनजागृती करण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत  करावी लागत आहे.
 कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले. त्यातच मास्क सोशल डिस्टंसिंग व स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर व जनजागृती नेहमीच करण्यात आली. आता लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.  लसीकरणाच्या सुरुवातीच्या सत्रात ग्रामीण भागात लसीकरणासाठी प्रशासनाला जिवाचा आटापिटा करावा लागला. 
ग्रामीण भागात लसीकरणाने मृत्यू होतो, निपुत्रिकपणा होतो, अशी अफवाच पसरविण्यात आली.  त्याचा परिणाम लसीकरणावरही पडला. मात्र प्रशासनाने  आव्हान पेलले. निरंतर जनजागृतीमुळे ग्रामीण भागात ह्या सर्व बाबी अफवा आहेत हे पटवून देण्यात यश मिळविले असून शासनाने कठोर पावले उचलली आहेत.

काय आहेत अफवा

लसीकरणानंतर मृत्यू होतो 
ग्रामीण भागात कुठे कुठे लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे अनेक नागरिक भीतीपोटी लसीकरणासाठी केंद्रांवर गेलेच नाही. हळूहळू जनजागृतीनंतर तरूणांनीच पुढकार घेतला. अफवांवर पटकन विश्वास ठेवणारे लाेकांना ही चूक लक्षात येतय ही महत्वाची बाब ठरली.

निपुत्रिक होण्याची शक्यता
लसीकरणानंतर निपुत्रिक होण्याची दाट शक्यता असते याची अफवाच ग्रामीण भागात पसरविण्यात आली. त्यामुळे अनेक स्त्रियाही लसीकरणासाठी गेल्या नाहीत. अशी बाब नंतर उघडकीला आली. मात्र हळूहळू प्रशासनाने ही सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. लसीकरणाला वैद्यकीय आधार आहे, हे महत्वाचे आहे.

लसीकरणानंतर घरघर वाटते
कुठलीही लस घेतली तरी मानवी शरीराचे तापमान वाढत असते. ही एक सहज व सोपी प्रक्रीया आहे. असाच प्रकार कोरोना लसीकरणानंतरही झाला. लसीकरणानंतर घरघर वाटणे, ताप येतो ही साधारण बाब तिखट मिर्च लावून   अफवेच्या रुपात सांगण्यात आली. त्यामुळे अनेकांनी लसीकरणाला नकार दिला.

गावकरी संभ्रमात

 सुरुवातीला कोरोना लसीकरण करून घ्यायचे ठरवले होते. मात्र अफवांमुळे आम्हाला भीती वाटली. आम्ही संभ्रमात सापडलो होतो. परंतू लसीकरणानंतर कुठलीही गंभीर बाब उजेडात आली नाही तसेच शरीरावरही कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. 
- एक ग्रामस्थ, अड्याळ

कुठलीही मोहीम येण्यापूर्वी त्याची अफवा पहिले असते त्यामुळे लोकांच्या लवकर विश्वास बसतो. तसेच कोरोना लसीकरणबाबतही झाले आहे. आम्हाला पूर्वी भीती वाटायची, मात्र आता ही भीती दूर झाली आहे. 
- एक ग्रामस्थ, पालगाव

 अधिकारी म्हणतात,

 जिल्ह्यात लसीकरण मोहीम राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार सुरू आहे. सुरूवातीच्या काळात ग्रामीण क्षेत्रात काही ना काही अफवा ऐकायला मिळाल्यात. त्याबाबत आम्ही सातत्याने जनजागृतीवर भर दिला. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, वेळेतच प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा

 

Web Title: Death by vaccination, rumors of infertility; Exercise for public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.