कौटुंबिक वादातून जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

By admin | Published: September 26, 2015 12:33 AM2015-09-26T00:33:14+5:302015-09-26T00:33:14+5:30

माझ्या गैरहजेरीत येवून नवऱ्याला राखी का बांधली या कारणावरुन चुलत नणंदेसोबत झालेल्या भांडणात नणंद

Death of a woman with a family dispute during treatment | कौटुंबिक वादातून जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

कौटुंबिक वादातून जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Next

अकोला येथील घटना : मृत्यूस जबादार दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
तुमसर : माझ्या गैरहजेरीत येवून नवऱ्याला राखी का बांधली या कारणावरुन चुलत नणंदेसोबत झालेल्या भांडणात नणंद व भाच्याने त्या महिलेवर हात उगारला. यात तिला अपमानास्पद वाटल्याने या महिलेने मातीचे तेल ओतून पेटवून घेतले. दरम्यान, उपचारादरम्यान तिचा बुधवारला सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. माझ्या मृत्यूला नणद व भाचा कारणीभुत असल्याचे मृत्यूपूर्व बयानात तिने म्हटले होते.
याप्रकरणी तुमसर पोलिसांनी दोघांविरुध्द भादंवि ३०६, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करुन अटक केली आहे. लता पारस माहे (३०) रा. अकोला (आंधळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. सीमा मासुलकर (४०) अर्दिश मासुलकर (१९) रा. मिटेवानी ता. तुमसर असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
लता माटे ही तुमसर तालुक्यातील साखळी येथील रहिवासी असून तिचे चार वर्षापुर्वी मोहाडी तालुक्यातील अकोला येथील पारस माटे यांच्याशी विवाह झाला. या विवाहासाठी पारसची चुलतबहिण सिमा मासुलकर यांनी मध्यस्थी केली होती. दोन वर्षांनंतर लता व सिमा यांच्यात पटत नव्हते. मध्यंतरी रक्षाबंधनासाठी सिमा ही अकोला येथे माहेरी आली होती. त्यावेळी लता माटे ही माहेरी गेली होती. त्या दिवशी सिमाने चुलतभाऊ पारस माटेला राखी बांधली होती. माहेरुन परत येताच तिने नवऱ्याकडे राखी कोणी बांधली म्हणून विचारले असता त्याने सिमाने राखी बांधल्याचे सांगताच लता पतीवर जाम भडकली. त्यानंतर पती, चुलत बहिण यांच्यात वाद झाला. भांडणादरम्यान लताला मारहाण झाल्यामुळे तिला अपमानास्पद वाटले. त्यानंतर त्याच रात्री तिने अंगावर केरोसीन ओतून पेटवून घेतले. त्यात ती ७० टक्के जळाल्याने तिला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान बुधवारला तिचा मृत्यू झाला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Death of a woman with a family dispute during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.