अपघातात तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:41 PM2017-12-03T22:41:54+5:302017-12-03T22:42:15+5:30

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावानजीक सिलेगाव फाट्याजवळ दुचाकी चालकाने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला.

Death of the youth in an accident | अपघातात तरुणाचा मृत्यू

अपघातात तरुणाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देदोन जखमी : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील घटना

आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावानजीक सिलेगाव फाट्याजवळ दुचाकी चालकाने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर अन्य २ जण जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. मनोज शरणागत (२५) रा. सिहोरा असे मृत तरुणाचे नाव आहे.
तुमसर-बपेरा राज्य मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची श्रृंखला सुरु झाली आहे. दररोज अपघात घडत आहेत. या खड्ड्यांनी दोन वर्षात ११ जणांचा बळी घेतला आहे. राज्य मार्गावरुन रहदारी करणारे वाहनधारक असुरक्षित असल्याचा अनुभव घेत आहेत. शनिवारी सिहोरा येथील मनोज शरणागत आणि तोषिण शेख हे दोघे मित्र दुचाकी क्रमांक एम एच ४० झेड ३७७२ ने तुमसरकडे निघाले. राज्यमार्गावर सिलेगावकडून सायकलने सुखलाल पारधी हे येत होते. यात दुचाकीने सायकलस्वारला जोरदार धडक दिली. या धडकेत मनोज शरणागत (२५) रा. सिहोरा हा गंभीर जखमी झाला. उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला तोषिण शेख आणि सायकलस्वार सुखलाल पारधी हे गंभीर जखमी झाले. गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तुमसरच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मनोजचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता तुमसर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. सिहोरा पोलीसांनी घटनेची नोंद केली असून तपास पोलीस निरीक्षक मनोहर कोरोटी यांच्या मार्गदर्शनात जयसिंग लिल्हारे करित आहेत.

वाहनाच्या धडकेत वाहक जखमी
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील सिंदपुरी येथे राज्य मार्गाच्या कडेला उभा असलेल्या चैतन्य संजय शरणागत (५) वर्ष या बालकाला बपेराहून तुमसरकडे जाणाºया दुधाची वाहतूक करणाºया वाहनाने धडक दिली. जखमी बालकाला सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शीनी धडक देणाºया वाहनाचे क्रमांक एम एच ३६- ३२०७ असल्याची माहिती दिली आहे. तुमसर बपेरा राज्य मार्गावर दोन दिवसात दोन अपघात घडले. दुधाची वाहतुक करणाºया वाहनाने बालकाला धडक दिल्यानंतर सिलेगावात एका घराच्या सुरक्षा भिंतीला धडक दिली. या अज्ञात वाहनाचा शोध वाहतुक पोलीस सतीश सार्वे घेत आहेत.

वळणावर फलक नाहीत
राज्य मार्गाची थातुरमातुर दुरुस्ती, यामुळे मार्गाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. या राज्य मार्गावर अनेक नागमोडी वळण आहेत. या वळणावर दिशादर्शक फलक लावण्यात आले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग (शहर) चे यात सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या विभागाच्या यंत्रणेला अपघाताला जबाबदार धरण्यात येत आहे.

Web Title: Death of the youth in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.