क्षुल्लक वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:30 AM2021-05-03T04:30:18+5:302021-05-03T04:30:18+5:30
दैतमांगली येथील अल्पवयीन बालकाने भोजराम मोडकू शेंडे (७१) यांच्या घरासमोर येऊन मुलगा नंदू भोजराम ...
दैतमांगली येथील अल्पवयीन बालकाने भोजराम मोडकू शेंडे (७१) यांच्या घरासमोर येऊन मुलगा नंदू भोजराम शेंडे (३८) याला शिवीगाळ करीत असताना भोजराम शेंडे यांनी हटकले असता त्यांना बासाच्या काठीने हातापायावर मारून जखमी केले. भोजराम शेंडे यांना उपचारासाठी नेत असताना अल्पवयीन बालकाने मोटारसायकलवर मागे बसलेल्या नंदू भोजराम शेंडे (३८) रा. दैतमांगली याचा मृत्यू झाला. या युवकासही डोक्यावर जबर मारहाण केल्याने उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली, तर त्याचे वडील भोजराम मोडकू शेंडे (७१) हे गंभीर जखमी झाले. नंदू शेंडे हे वंचित बहुजन आघाडी लाखनीचे तालुका कोषाध्यक्ष होते.
गावातील क्षुल्लक वादावरून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यांना लगेच भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे आज त्यांना नागपूरला हलविण्यात येत होते. परंतु दुर्दैवाने भंडारा येथील सामान्य रुग्णालयात रविवारी दुपारी ३.३० वाजेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप घरडे, पोलीस शिपाई निशांत माटे करीत आहेत.