पीक कर्जवाटपात कर्जमुक्तीने बँका मेहरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:38 AM2021-03-23T04:38:03+5:302021-03-23T04:38:03+5:30
२०१६ च्या तुलनेत २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणात कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. यातून ३० हजार ९७१ शेतकरी नव्याने कर्ज ...
२०१६ च्या तुलनेत २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणात कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. यातून ३० हजार ९७१ शेतकरी नव्याने कर्ज वितरण प्रक्रियेमध्ये आले आहेत. या परिस्थितीत निसर्ग प्रकोपाने पुन्हा घाला घातला आहे.
कोट
जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना १०६ टक्के कर्जाचे वितरण बँकांनी पूर्ण केले आहे. काही ठिकाणी कॅम्पही लावण्यात आला. एकूण कर्ज वितरणामध्ये बँकांनी कुठलीही कसर केली नाही.
- अशोक कुंभलवार, व्यवस्थापक, अग्रणी बँक
कर्जमुक्ती योजनेमध्ये माझा समावेश झाला. यानंतर नव्याने कर्ज मिळाले, मात्र, मिळणारे कर्ज तुटपुंजे आहे. बँकांनी शेतीचा वाढता खर्च लक्षात घेता, २५ ते ३० टक्के कर्जमर्यादा वाढवून द्यायला हवी. याशिवाय, नियमित परतफेडीमुळे प्रोत्साहन अनुदान द्यायला हवे.
-उमराव मस्के
कर्जमाफी योजनेमध्ये बसल्यानंतर तब्बल काही दिवसांनी कर्जमाफी मंजूर झाली. त्यानंतर नव्याने कर्ज मिळाले. कर्ज वितरण धोरणांमध्ये भरीव वाढ करण्याची आवश्यकता आहे, तरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होईल.
- यादोराव नंदेश्वर,
३०,९७१ कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या