शिवसैनिकांचा कजर्मुक्तीचा संकल्प

By Admin | Published: June 2, 2017 12:27 AM2017-06-02T00:27:45+5:302017-06-02T00:27:45+5:30

येथील संताजी सभागृहात शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न झाली. हि बैठक ‘मी कजर्मुक्त होणारच’ गर्जतो शेतकरी

The debt relief for Shivsainiks | शिवसैनिकांचा कजर्मुक्तीचा संकल्प

शिवसैनिकांचा कजर्मुक्तीचा संकल्प

googlenewsNext

पवनी येथे बैठक : प्रत्येक शेतकऱ्यांची कैफियत जाणून घेणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : येथील संताजी सभागृहात शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न झाली. हि बैठक ‘मी कजर्मुक्त होणारच’ गर्जतो शेतकरी या मुद्द्यावर शिवसैनिकांना उर्जा देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
१९ मे ला नाशिक येथे शिवसेनेचा राज्यस्तरीय शेतकरी मेळावा संपन्न झाला. तिथे ‘मी कजर्मुक्त होणारच’ या मुद्द्यावर रणशिंग फुकण्यात आले. त्या अनुशंगाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावून नाशिक येथील मेळाव्याची संपूर्ण माहिती विश्राम गृह भंडारा येथे सांगितले.
‘मी कजर्मुक्त होणारच’ या मुद्द्यावर मार्गदर्शन करून कर्जमुक्तीचे फॉर्म वाटप करण्यात आले. प्रत्येक शिवसैनिकांनी गावोगावी प्रत्येक शेतकऱ्यांशी संपर्क साधून फॉर्म भरून त्यांच्या व्यथा जाणून घेऊन दिलेला फॉर्म भरवून घेण्याचे आव्हान जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी शिवसैनिकांना केले. शेतकऱ्यांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार येणार नाही, कर्जमुक्ती झाल्यावर शेतकरी आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहावे हाच विचार घेऊन शिवसैनिक व शेतकऱ्यांचे तरुण मूल जिल्ह्यातील गावोगावात जाऊन ‘मी कजर्मुक्त होणारच’ या विषयाला घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांशी संपर्क साधत आहेत. ‘मी कजर्मुक्त होणारच’ हे फॉर्म भरून झाल्यास जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे तालुका प्रमुख यांच्याकडे जमा करावे. बैठकीला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, विजय काटेखाये, संजय रेहेपाडे, डॉ. अनिल धकाते, तालुका प्रमुख राजू ब्राम्हणकर, भरत वंजारी, शहर प्रमुख नरेश बावनकर, जिल्हा अमित मेश्राम, युवासेना जिल्हाप्रमुख मुकेश थोटे, मनोज चौबे, बाळकृष्ण फुलबांधे, जिल्हा विद्यार्थीसेना प्रमुख जितेश इखार, वाहतूकसेना जिल्हा प्रमुख दिनेश पांडे, जगदीश त्रिभूवनकर, लोकेश बानोटे, प्रकाश मानापुरे, प्रमोद मेंढे, शिवशंकर फंदी, प्रशांत भुते आदी उपस्थित होते.

Web Title: The debt relief for Shivsainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.