कर्जमाफी हे दिवास्वप्न -पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 11:58 PM2017-10-03T23:58:49+5:302017-10-03T23:59:01+5:30

आपल्या गरजा शेतीवर अवलंबून असल्याने शेतीला उद्योगाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. सरकारची भागीदारी शेतीत वाढविणे महत्त्वाचे आहे.

Debt waiver is a day dream | कर्जमाफी हे दिवास्वप्न -पटोले

कर्जमाफी हे दिवास्वप्न -पटोले

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या गरजा शेतीवर अवलंबून असल्याने शेतीला उद्योगाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : आपल्या गरजा शेतीवर अवलंबून असल्याने शेतीला उद्योगाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. सरकारची भागीदारी शेतीत वाढविणे महत्त्वाचे आहे. सरकारचे धोरण शेतकºयांप्रती सकारात्मक नसल्याने राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. धानाचे भाव अर्धेच आहेत. कर्जमाफी दिवास्वप्न असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
पालांदूर येथे आयोजित दसरा उत्सवात ते बोलत होते. मंचावर आमदार बाळा काशीवार, सभापती विनायक बुरडे, सरपंच शुभांगी मदनकर, वैशाली खंडाईत, उपसभापती विजय कापसे, ज्येष्ठ नागरीक दामाजी खंडाईत, तु.रा. भुसारी, जिल्हा परिषद सदस्या वर्षा रामटेके, उपसरपंच ईश्वर तलमले, पा.मा. खंडाईत, के.मा. कापसे, केशव कुंभरे, प्रा.आनंदराव मदनकर, मोरेश्वर खंडाईत, नितीन रणदिवे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले,
प्रास्ताविकातून स्वागताध्यक्ष भरत खंडाईत यांनी १९८४ पासूनची दसरा उत्सवाची परंपरा सुदाम खंडाईत, फत्तू फरांडे यांनी टिकवित त्यावेळचे सरपंच दामाजी खंडाईत यांने सुद्धा सहकार्य केल्याचे सांगत आजच्या तरुण पिढीने हा वारसा पुढे न्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. संचालन सेवानिवृत्त शिक्षक कृष्णा जांभुळकर यांनी केले.
 

Web Title: Debt waiver is a day dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.