२६ गावांच्या ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:32+5:302021-09-27T04:38:32+5:30

२६ लोक १७ के भंडारा : जिल्ह्यातील गोसे प्रकल्पामुळे अंशत: बाधित होणाऱ्या २६ गावांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव ...

Decision to approve voluntary rehabilitation of 26 villages in phases | २६ गावांच्या ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय

२६ गावांच्या ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय

googlenewsNext

२६ लोक १७ के

भंडारा : जिल्ह्यातील गोसे प्रकल्पामुळे अंशत: बाधित होणाऱ्या २६ गावांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ऐच्छिक पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली असून, या गावांच्या ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी प्रदान करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. आमदार नाना पटोले यांच्या पुढाकाराने ही बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती.

भंडारा जिल्ह्यातील गोसे प्रकल्पामुळे अंशत: बाधित होणाऱ्या २६ गावांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याबाबत ना. विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली तसेच आमदार नाना पटोले, प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन असिम गुप्ता, जिल्हाधिकारी संदीप कदम, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अर्चना यादव, यांचे उपस्थितीत आढावा सभा घेण्यात आली.

अधीक्षक अभियंता गोसे प्रकल्प मंडळ, नागपूर यांचे कार्यालयाकडून भंडारा जिल्ह्यातील गोसे प्रकल्पामुळे अंशत: बाधित होणाऱ्या २६ गावांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याअनुषंगाने ऐच्छिक पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. २६ गावांच्या ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी प्रदान करण्याबाबत सभेमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

Web Title: Decision to approve voluntary rehabilitation of 26 villages in phases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.